पतीने किन्नरसोबत लग्न केल्यावर पत्नीने उचललं धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 05:10 PM2023-06-29T17:10:00+5:302023-06-29T17:19:41+5:30

Marriage News : लग्नानंतर त्याने घरी पत्नीकडे येणं-जाणं कमीच केलं होतं. नंतर त्याने घरखर्च देणंही बंद केलं होतं.

Wedding News: बिहारच्या आरामधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका पतीने किन्नरासोबत लग्न केल्यावर नाराज झालेल्या पत्नीने विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

यादरम्यान पत्नीची स्थिती जास्त बिघडली आणि याची माहिती पतीला मिळाली तर तो तिला उपचारासाठी लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. जिथे महिलेवर उपचार सुरू आहेत.

ही घटना कनैली गावातील आहे. विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेली महिला कनैली गावातील मधु शाहची 28 वर्षीय पत्नी राणी देवी आहे. तिच्या गर्भात 4 महिन्यांचं बाळही आहे.

हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या राणी देवीने सांगितलं की, 2020 मध्ये कनैली गावातील मधु शाहसोबत तिचं लग्न झालं होतं. मधु शाह पटणामध्ये बस चालवतो.

काही दिवसांनी मधु शाहने पटणामध्येच राहणाऱ्या एका किन्नरसोबत लग्न केलं. लग्नानंतर त्याने घरी पत्नीकडे येणं-जाणं कमीच केलं होतं. नंतर त्याने घरखर्च देणंही बंद केलं होतं.

काही काम असेल तेव्हा त्याला पत्नीने बोलवलं तर तो माझ्याकडे वेळ नाही असं स्पष्ट सांगत होता. ज्यामुळे महिला वैतागली होती. महिलेने पुढे सांगितलं की, दोन दिवसांआधी पती जेव्हा गावात आला तेव्हा तिने त्याला घरखर्चासाठी पैसे मागितले तेव्हा त्याने तिला मारहाण केली.

तसेच तो पत्नीला म्हणाला की, मला तुझ्याशी काही देणंघेणं नाही. विष खा नाही तर कुठेही जा. महिला म्हणाली की, मी त्याला विष आणून देण्यास सांगितलं तर घेऊन आला. मी त्याच्यासमोरच विष खाल्लं. माझ्या पोटात त्याचं 4 महिन्यांचं बाळही आहे.

तेच महिलेचा पती मधु शाह म्हणाला की, मी पटणामध्ये राहून बस चालवतो. काही वर्षाआधी माझा अपघात झाला होता. त्यावेळी एका किन्नराने मला उपचारासाठी 90 हजार रूपये दिले होते. सगळं काही ठीक झाल्यावर किन्नर म्हणाला की, माझं कुणीच नाही, पण माझ्याकडे सगळंकाही आहे. तू माझ्याशी लग्न कर. ज्यानंतर मी किन्नरसोबत लग्न केलं.