पत्नीला भावनिक आदरांजली, मुलीसोबत रिक्रिएट केला तो आनंदी क्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 03:33 PM2021-08-31T15:33:15+5:302021-08-31T16:13:38+5:30

जेम्स हा मोटीव्हेशनल स्पीकर, ब्लॉगर असून त्याने अतिशय भावनिक शब्दात आठवणी जागवल्या आहेत. दुर्दैवाने ज्यादिवशी पत्नीची पुण्यतिथी असते, त्याचदिवशी मुलीचा जन्मदिवस असतो, असेही जेम्सने सांगितलंय.

पत्नी-पत्नीच्या नात्याला अधिक घट्ट करतात ती मुले. चिमुकल्यांच्या आगमनानंतर वेगळ्याच आनंदी आयुष्याला सुरूवात होती.

सात जन्म सोबत राहणाऱ्याची शपथ घेतल्यानंतर आयुष्याची लगीनगाठ बांधली जाते. सुखी संसाराला सुरुवात होते. जेम्स अल्व्रेझ यांचंही आयुष्य आनंदी बनलं होतं.

पण, काळाने मोठा आघात जेम्स यांच्यावर केला. पत्नी 9 महिन्यांची गरोदर असताना रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला अन् दु:खाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला.

अपघातानंतर पत्नीच्या पोटातील बाळ वाचविण्यात डॉक्टरांना यश आलं. पण, त्यानंतर चिमुकल्या मुलीसोबतच जेम्स अल्व्रेझचं आयुष्य सुरू झालं. पत्नी गेली अन् तिची निशाणी सोडून गेली.

अल्व्रेझनं चिमुकलीच्या पहिल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना अतिशय भावनिक फोटोशूट केलंय. पत्नीसोबतचे जुने क्षण त्याने रिक्रिएट केलेत. सोशल मीडियाही हे फोटो पाहून भावूक झाल्याचं दिसून आलं.

वडिल जेम्स यांनी 1 वर्षाच्या अडलेन हिच्यासोबत फोटो काढताना आपली पत्नी येसिनिया एग्युलर हिचाही फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे बेबी शॉवरदरम्यान ज्या जागेवर फोटोशूट केलं होतं. तोच सीन रिक्रिएट केलाय.

येसियानी ही मॉर्निग वॉकसाठी जात असताना तिला कारने धडक दिली, त्यावेळी ती 35 महिन्यांची प्रग्नंट होती. चिमुकल्या अडलेनच्या पहिल्या वाढदिनी आज जेम्सने त्या आठवणी जागवल्या आहेत.

जेम्सचे हे भावनिक क्षण सोशल मीडियालाही भावूक करून गेले आहेत, त्यामुळेच ही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत चिमुकलीच्या अंगावरही गुलाबी रंगाचाच ड्रेस आहे, जो आईच्या अंगावर दिसतो.

एडलेन आज तुम्ही आई असती तर सर्वात जास्त आनंद तिलाच झाला असता. तुझा वाढदिवस साजरा करायला ती सर्वाधिक उत्साही असती, असे कॅप्शन जेम्सने इंस्टावर दिले आहे.

जेम्स हा मोटीव्हेशनल स्पीकर, ब्लॉगर असून त्याने अतिशय भावनिक शब्दात आठवणी जागवल्या आहेत. दुर्दैवाने ज्यादिवशी पत्नीची पुण्यतिथी असते, त्याचदिवशी मुलीचा जन्मदिवस असतो, असेही जेम्सने सांगितलंय.