Corona Testing: धक्कादायक ट्रीक! कोला आणि फळांच्या रसामुळे मुले होतायत 'कोरोना पॉझिटिव्ह'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 09:31 AM2021-07-04T09:31:19+5:302021-07-04T09:37:35+5:30

Corona positive fake report, fake testing: शाळेत जायचे नसेल तर दाढ दुखतेय, पोटात दुखतेय, डोके दुखतेय आदी कारणे मुलांकडून दिली जातात. हे सर्रास जगभरात चालते. आता काही देशांमधील मुले एवढी पुढे गेली आहेत की, त्यांनी खोटे कोरोना पॉझिटिव्ह दाखविण्यासाठी एक ट्रीक शोधून काढली आहे.

शाळेत जायचे नसेल किंवा सध्याची ऑनलाईन शाळेला दांडी मारायची असेल तर कोरोना पॉझिटिव्ह नसतानाही मुले कोरोना पॉझिटिव्ह येण्याची ट्रीक अवलंबत आहेत. धक्कादायक म्हणजे टेस्टिंग किटदेखील या अजब रसायनासमोर फेल ठरू लागले आहे. (Children are always going to find cunning ways to bunk off school, and the latest trick is to fake a positive Covid-19 lateral flow test (LFT) using soft drinks.)

शाळेत जायचे नसेल तर दाढ दुखतेय, पोटात दुखतेय, डोके दुखतेय आदी कारणे मुलांकडून दिली जातात. हे सर्रास जगभरात चालते. आता काही देशांमधील मुले एवढी पुढे गेली आहेत की, त्यांनी खोटे कोरोना पॉझिटिव्ह दाखविण्यासाठी एक ट्रीक शोधून काढली आहे. (Fake corona positive)

यामुळे टेस्टिंग किट देखील फसत असून त्या मुलांना कोरोना पॉझिटिव्ह नसतानाही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दाखवत आहेत. एका प्राध्यापकाच्या ही बाब लक्षात आल्याने याचा भांडाफोड झाला आहे.

लेटरल फ्लो टेस्ट (एलएफटी) किटमध्ये सॉफ्ट ड्रिंक आणि फळांचा रस टाकला जात आहे. यामुळे त्यातील आम्लामुळे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे.

मुलांची ही चलाखी ब्रिटनच्या एका विद्यापीठाचे प्राध्यापक मार्क लॉर्च यांच्या लक्षात आली. यामुळे त्यांनी हा प्रयोग करून पाहिला. कोला आणि फळांच्या रसाचे थेंब त्यांनी टेस्टिंग किटमध्ये टाकले. काही मिनिटांतच किटवर पॉझिटिव्ह दाखविणारी दोन लाल रंगातील लाईन दिसू लागली.

तांत्रिक दृष्ट्या त्या सॅम्पलमध्ये कोरोना विषाणू असल्याचे सिद्ध झाले. परंतू प्रत्यक्षात त्यामध्ये कोरोना नाही तर आम्ल होते.

यासाठी मार्कने किट खोलले. यामध्ये कागदी नायट्रोसॅलूलोजची पट्टी आणि छोटे लाल रंगाची जाळी मिळाली. ही जाळी कोरोना व्हायरसला पकडण्यासाठी अँटीबॉडी असलेली असते. ती गोल्ड नॅनोपार्टिकलची असते.

जेव्हा एलएफटी टेस्ट केली जाते, तेव्हा सॅम्पल बफर सोल्यूशनमध्ये मिसळले जाते. यामुळे स्ट्रीपवर पडल्यावर त्याचा पीएच स्तर योग्य रहावा.

फळांच्या रसामध्ये आणि सॉफ्ट ड्रिंकमध्ये असलेले आम्ल हे या अँटिबॉडीला प्रभावित करते. यामध्ये संत्रे -सायट्रिक अॅसिड, कोला- फॉस्फोरिक अॅसिड आणि अन्य फळांमध्ये असलेली अॅसिड ज्यांची पीएच लेव्हल २.५ ते ४ एवढी असते, त्यांचा अँटिबॉडीवर परिणाम होतो. यामुळे ही टेस्ट पॉझिटिव्ह येते.

टेस्ट किटवर सॅम्पलचा पीएच स्तर योग्य असणे गरजेचे आहे. मात्र, या कोला, फळांच्या रसामुळे पीएच स्तर बिघडतो. तसेच जर कोलाला बफरसोबत मिसळले तर कोरोना टेस्ट निगेटिव्ह येते. मात्र, बफर नसल्यास अँटिबॉडी चुकीचा निकाल देते.