स्नायू मजबूत अन् नसा निरोगी ठेवतं 'मॅग्नेशियम'; दररोज खा पोषक द्रव्य असलेले 'हे' 5 पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 02:11 PM2023-08-22T14:11:20+5:302023-08-22T14:22:31+5:30

स्नायू नसांसोबतच मानसिक प्रक्रियेचाही मॅग्नेशियम घटकाचा संबंध असतो

Top 5 Magnesium Rich Food Options: शरीरातील पोषक तत्वांमध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने किंवा फायबर यांच्यासोबतच मॅग्नेशियम हा घटकही महत्त्वाचा असतो. शरीरातील अनेक मानसिक प्रक्रिया व शरीरातील स्नायू तयार करण्याचे आणि नसा निरोगी ठेवण्याचे काम हाच घटक करतो. पुढील पाच गोष्टींचे रोज सेवन केल्याने तुमच्या शरीरात कधीही मॅग्नेशियमची कमी भासणार नाही.

बदाम खाल्ल्याने दैनंदिन गरजेच्या २०% (७६ मिलीग्राम) मॅग्नेशियम मिळते. दररोज मूठभर बदाम खाणे हा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचा आणि मॅग्नेशियम मिळण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम जास्त असते, जे बहुतेक लोकांना त्यांच्या आहारातून पुरेसे मिळत नाही. प्रत्येक 100 ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये 262 मिलीग्राम मॅग्नेशियम असते. हे तुमच्या दैनंदिन मॅग्नेशियमच्या 65% गरज पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे.

हे पोटॅशियम युक्त आणि हृदयासाठी निरोगी आणि हाडे मजबूत करणारे फळ आहे. एक मध्यम केळी 10.3 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आणि 32 मिलीग्राम मॅग्नेशियम देखील प्रदान करते.

एक कपभर कच्च्या पालकामध्ये २४ मिलीग्राम मॅग्नेशियम १९ असते. पण शिजवलेल्या पालकामध्ये 157 मिलीग्राम मॅग्नेशियम असते. पालक देखील लोहाचा उत्तम स्रोत आहे. आपण ते हलके शिजवावे आणि खावे.

काजू हे मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असलेले ड्रायफूट आहे. 100 ग्रॅम कच्च्या काजूच्या सेवनाने 251 मिलीग्राम मॅग्नेशियम मिळते. याशिवाय, हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि प्रथिनेचा एक उत्तम स्रोत आहे.