१०० वर्षांनी मिळालं यश, मानवी शरीरात नवीन अवयव सापडला; करतो सर्वात महत्त्वाचं काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 12:34 PM2021-12-24T12:34:05+5:302021-12-24T12:38:48+5:30

मानवी शरीराचा एक नवीन अवयव संशोधनात समोर आला आहे. याआधी कधीही स्टडीमध्ये त्याचा खुलासा झाला नाही. हा अवयव आपल्या खालच्या जबड्याच्या शेवटी स्थित असतो. ज्याच्या मदतीने आपला जबडा हलतो. हा गालाच्या आत असलेल्या स्नायूंचा खोल थर आहे. त्याच्यामुळे जबड्याने वरखाली करण्यास मदत मिळते.

आधुनिक शरीरशास्त्राच्या पुस्तकांमध्ये(Anatomy Science) असे लिहिले आहे की, गालातील स्नायूमध्ये दोन स्तर असतात. काही ऐतिहासिक मेडिकल दस्तावेजात त्याचा उल्लेख करण्यात आला आहे की, गालांमध्ये स्नायूंचा तिसरा थर देखील असू शकतो. पण त्याच्या जागेबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

मानवी शरीरात नवीन अवयव शोधण्याचा रिपोर्ट नुकताच अॅनल्स ऑफ अॅनाटॉमी(Annals of Anatomy) या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. त्यासाठी वैज्ञानिकांनी आता या अवयवाबद्दल आणखी शोध घेणार असल्याचं सांगितले आहे.

या शोधातून ऐतिहासिक कागदपत्रांच्या दाव्याची पडताळणी केली जाईल. शास्त्रज्ञांनी १२ मानवी मृतदेहांचे शीर कापले आहेत. हे शीर फॉर्मलडीहाइडमध्ये ठेवण्यात आले होते. यानंतर नवीन १६ शवांचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यानंतर काही जिवंत माणसांच्या जबड्यांचा एमआरआय करण्यात आला.

या तपासात गालातील स्नायूंमध्ये आणखी एक खोल थर आहे, जो रचनेच्या आधारावर इतर दोन स्तरांपेक्षा वेगळा आहे. हा स्नायू प्रत्यक्षात हाडासारखा दिसतो. हा नवीन स्नायू हाडासारखा दिसण्याचे कारण म्हणजे त्याच्या आजूबाजूला हाडे असतात. ज्यांना गालाची हाडे(Cheek Bones) म्हणतात.

हा कानाजवळ समोरच्या बाजूला स्थित आहे. शास्त्रज्ञांनी खालच्या जबड्याच्या अगदी वर त्रिकोणी आकाराचा फुगवटा देखील पाहिला, जो या नवीन स्नायूमुळे तयार झाला होता. जे या नवीन स्नायूमुळे तयार झाले आहे. हा स्नायू जबड्याला उघडझाप करण्यासाठी, हालचालींसाठी मदत करतो.

स्वित्झर्लंडमधील बेसेल विद्यापीठातील बायोमेडिसिन विभागातील वरिष्ठ प्राध्यापक आणि या अभ्यासाचे प्रमुख संशोधक झिल्व्हिया मेझी यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही गालातील स्नायूंचं बारकाईने परिक्षण केले तेव्हा आम्हाला त्यात ३ स्तर असल्याचं स्पष्टपणे दिसले. २ वरच्या बाजूला आहेत तर तिसरी खालच्या बाजूस आहे.

झिल्व्हिया मेझी म्हणाल्या की, नवीन स्नायू हा गालातील स्नायूमधील एकमेव स्नायू आहे जो जबड्याचे हाड मागे खेचण्यास मदत करतो. तर प्रोफेसर डॉ. जेन्स क्रिस्टोफ टार्प म्हणाले की, १०० वर्षांपासून या गोष्टीचा अभ्यास केला जात होता आणि त्याचा शोध लावला जात होता, परंतु या स्नायूचा शोध लागला नव्हता.

या नवीन अवयवाला मस्क्यूलस मैसेटर पार्स कोरोनिडिया (Musculus Masseter Pars Coronidea) असं नाव देण्यात आलं आहे. सामान्य भाषेत मासेटरचा कोरोनॉइड भाग. हा शोध यासाठी देखील महत्त्वाचा आहे कारण डॉक्टर आणि शास्त्रज्ञ आता जबड्याच्या स्नायूंचा अधिक अभ्यास करू शकतील.

या स्नायूचा अभ्यास केल्यानंतर डॉक्टर अधिक चांगली शस्त्रक्रिया करू शकतील. जेणेकरून जबड्याचा हा भाग चांगला मानून तो लोकांना विविध प्रकारच्या आजारांपासून मुक्त करू शकेल. कारण हा स्नायू जबडा कवटीला जोडतो. त्यामुळे त्याचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे.