Health tips: विचित्र दिसणारे 'हे' मॅक्सिकन फळ अनेक गंभीर आजारांवर आहे रामबाण, अशाप्रकारे करा सेवन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 08:26 PM2022-06-22T20:26:49+5:302022-06-22T20:35:41+5:30

साधारणपणे लोक ड्रॅगन फ्रूटला चीनचे फळ मानतात पण असे नाहीये. जरी ड्रॅगन फ्रूटचे मूळ मेक्सिकोमध्ये असल्याचे मानले जात असले तरी आज ते जगाच्या विविध भागांमध्ये उत्पादित केले जाते. ड्रॅगन फ्रूट हायलोसेरस नावाच्या कॅक्टसवर वाढते. ड्रॅगन फ्रूट हे पोषक तत्वांनी युक्त अन्नपदार्थ आहे. याचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत.

या फळाचे सेवन केल्यास मधुमेह आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. ड्रॅगन फ्रुटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर्स आणि व्हिटॅमिन सी आढळतात. हे अनेक गंभीर आजार बरे होण्यास मदत करतात.

ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

ड्रॅगन फ्रूट हे सुपरफ्रूट (Dragon Fruit Benefits) मानले जाते कारण ते आरोग्यासाठी खूप चांगले असते.

ड्रॅगन फ्रुट ऊर्जा समृद्ध फळ आहे. एका ड्रॅगन फळामध्ये 102 कॅलरी ऊर्जा असते. कार्बोहायड्रेट्सचा हा एक उत्तम स्रोत आहे. एका ड्रॅगन फळामध्ये 22 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय 13 ग्रॅम साखरही असते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ड्रॅगन फ्रूटमध्ये फॅट नसते. त्यामुळे हृदयरोग्यांसाठी ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit For Heart Patient) अत्यंत उपयुक्त आहे.

ड्रॅगन फ्रूटच्या बियादेखील खूप फायदेशीर (Dragon Fruit Seed Benefits) असतात. ड्रॅगन फ्रूट पचनक्रिया बळकट बनवते. याच्या बियांमध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-९ फॅटी अॅसिड्स आढळतात. ज्यामुळे हृदयाच्या पेशी मजबूत होतात. ड्रॅगन फ्रूटमध्ये फॅट अजिबात नसते. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. ड्रॅगन फ्रूटचे सेवन वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

ड्रॅगन फ्रुटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक अॅसिड आणि बेटासायनिन्स यांसारखे अँटिऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे वृद्धत्वाचा प्रभाव कमी होतो. हे फ्री रॅडिकल्समुळे होणारे पेशींचे नुकसान टाळते. फ्री रॅडिकल्समुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते आणि कर्करोगदेखील (Dragon Fruit For Cancer) होऊ शकतो.

ड्रॅगन फ्रूटमध्ये प्रीबायोटिक गुणधर्म असतात. जे आतड्यातील चांगल्या जीवाणूंना पोषण पुरवते. म्हणजेच ड्रॅगन फ्रूट हे निरोगी जीवाणूंसाठी अन्न म्हणून काम करते. आतड्यात निरोगी जिवाणूंची संख्या खूप जास्त असेल तर पचनसंस्थेला (Dragon Fruit For Intestine) खूप चालना मिळते. प्रीबायोटिक्स वाईट जीवाणू नष्ट करताना चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देतात.

ड्रॅगन फ्रूट रक्तातील साखर कमी करण्यासाठी (Dragon Fruit For Diabetes) उपयुक्त असल्याचे मानले जाते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट स्वादुपिंडातील खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करतात. स्वादुपिंड निरोगी असेल तर इन्सुलिन हार्मोन योग्य प्रकारे तयार होतो. इन्सुलिन रक्तातील साखरेचे विघटन करून त्याचे ऊर्जेत रूपांतर करते. इन्सुलिन कमी असल्यास साखरेचे आजार होतात.

ड्रॅगन फ्रुटमध्ये बीटा कॅरोटीन आणि लायकोपीन आढळतात. कॅरोटीनॉइड समृद्ध अन्न सेवन केल्याने कर्करोग आणि हृदयविकाराचा धोकादेखील कमी होतो. आपल्या अन्नामध्ये फायबर असणे खूप महत्वाचे आहे आणि ड्रॅगन फ्रूटमधून पुरेसे फायबर मिळते. तुम्हाला संपूर्ण धान्य आवडत नसेल तर त्याजागी तुम्ही ड्रॅगन फ्रूट खाऊ शकता.

ड्रॅगन फ्रुटमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे (Dragon Fruit Boosts Immunity) गुणधर्म असतात. कारण त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-सी आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. हिवाळ्यात ड्रॅगन फ्रूटचे सेवन केल्याने विशेष फायदा होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने आपल्याला अनेक आजारांशी लढणे सोपे जाते.