कोरोनापासून बचावासाठी फक्त ग्लोव्हज मास्क नाही तर आहारातील 'हे' पदार्थ ठरतील इफेक्टीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 12:30 PM2020-04-14T12:30:33+5:302020-04-14T14:44:13+5:30

कोरोना व्हायरसचं संक्रमण जगभरासह भारतात सुद्धा वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या वाढत आहे. कोरोना व्हायरस हा एका संक्रमित व्यक्तीकडून इतर व्यक्तीकडे पसरत असला तरी अशा अनेक घटना समोर येत आहेत. ज्यात लॉकडाऊनमध्ये सुद्धा निष्काळजीपणामुळे लोकांना कोरोनाची लागण होत आहे.

कोरोना व्हायरसच्या बचावासाठी आहाराकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय खायला हवं याबाबत सांगणार आहोत.

आहार तज्ञांच्यामते योग्य आहार तुमच्या शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून काढतो. प्रोटिन्स, कॅल्शियम योग्य प्रमाणात शरीरात असेल तर तुम्ही व्हायरसपासून स्वतःचा बचाव करू शकता. त्यासाठी दिवसभरातून एक किंवा दोन वाटी डाळींचा आहार तुमच्या शरीरात जाऊ द्या, दूध, दही, पनीर या पदार्थांचा समावेश करा, त्यामुळे तुम्हाला प्रोटिन्स मिळतील.

आयोडीनचं मुख्य स्त्रोत असलेल्या पदार्थ आहारात असू द्या, भाजलेले चणे, भाजलेले शेंगदाणे, मोड आलेली कडधान्य आठवडयातून तीन वेळा नक्की खा. पीठापासून भाकरी किंवा चपाती तयार करत असताना पीठ चाळून घ्या.

भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा. हिरव्या मिरचीचं सेवन करा. तसंच दिवसभरातून ३ ते ४ लिटर पाणी प्या. शक्यतो कोमट पाणी प्या.

तीळ, लसूण, आळशीच्या बीया एक ते दोन चमचे रोज खाण्याचा प्रयत्न करा.

रात्री झोपतान हळदीचे दुध प्या. हळदीचे फायदे तुम्हाला माहीतच असतील, हळदीत अनेक एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवून आजारांशी लढण्यासाठी हळद फायदेशीर ठरते.

तुळस आणि आल्याचा काढा करून प्या. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढून इन्फेक्शनचा सामना करता येईल. सर्दी, खोकल्याच्या समस्या सध्याच्या परिस्थीतीत होऊ नये असं वाटत असेल तर या काढ्याचे सेवन फायदेशीर ठरेल.

दिवसभरातून २० ते १५ मिनिटं वेळ काढून व्यायाम करा. व्यायामुळे शरीर लवचीक राहील. तसंच शरीर जड झाल्यासारखं वाटणार नाही, दररोज व्यायाम केल्याने वजन वाढण्याची समस्या सुद्धा उद्भवणार नाही.