Fifa World Cup 2022: अर्जेंटिनाने ४-० अशी मजबूत पकड मिळवली असती; मात्र 'त्या' ३ चूकांमुळे संपूर्ण खेळ पलटला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 08:44 AM2022-11-23T08:44:33+5:302022-11-23T09:26:54+5:30

Fifa World Cup 2022: लुसैल स्टेडियममध्ये झालेल्या या मौदी अरब संघाने सामन्यात सौदी अरब आक्रमक खेळ करतानाच भक्कम बचावाचे शानदार प्रदर्शनही केले.

यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्याच दिवशी धक्कादायक निकाल लागला. फिफा क्रमवारीत ५१ व्या स्थानावरील सौदी अरबने तिसऱ्या स्थानावर असलेल्या लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाला मंगळवारी झालेल्या क गटाच्या सामन्यात २-१ असे पराभूत केले.

विशेष म्हणजे स्टार खेलाइ आणि कर्णधार लिओनेल मेस्सी खेळाडू याने पेनल्टी किकवर गोल करून आघाडी मिळवून दिल्यानंतरही संभाव्य विजेत्या आणि दोन वेळेच्या विश्वविजेत्या अर्जेंटिनाला विजय मिळवता आला नाही.

लुसैल स्टेडियममध्ये झालेल्या या मौदी अरब संघाने सामन्यात सौदी अरब आक्रमक खेळ करतानाच भक्कम बचावाचे शानदार प्रदर्शनही केले. या निराशाजनक पराभवासह अर्जेटिनाची सलग ३६ विजयांची मालिकाही संपुष्टात आली. अर्जेटिनाला आता बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी आपल्या उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवणे अनिवार्य बनले आहे.

पहिल्या सत्रात अर्जेंटिनाने वर्चस्व रालल्यानंतर दुसऱ्या सत्रात सौदी संघाने दबदबा राखला. सालेह अल्शेहरी याने ४८ व्या, तर सालेम अल्दावरसरी याने ५३ मिनिटाला गोल करत सौदी अरब संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली.

अर्जेंटिनाने आक्रमक चाली रचताना गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना गोलरक्षक मोहम्मद अल ओवेस याचा भक्कम बचाव भेदण्यात अखेरपर्यंत यश आले नाही.

अर्जेंटिनाने गोल करण्याच्या तब्बल १५ संधी निर्माण केल्या. त्यापैकी केवळ ६ वेळा त्यांनी गोलजाळ्याचा वेध घेतला. चेंडूवर सर्वाधिक ७० टक्के नियंत्रणही अर्जेंटिनानेच राखले. मात्र सौदी अरबने ज्या काही संधी मिळाल्या, त्यावर अप्रतिम कौशाल्य दाखवत वर्चस्व राखले.

पहिल्या सत्रात जबरदस्त वर्चस्व राखलेल्या अर्जेंटिनाने सामना जिंकण्याची मोठी संधी सोडली. पहिल्याच सत्रात त्यांच्याकडून झालेले तीन गोल ऑफसाइड निर्णयामुळे अवैध ठरले. याच तीन चूका महागात पडल्या. यामध्ये मेसी आणि लोटारो मर्टिंनेज यांनी केलेल्या गोलचाही समावेश आहे. हे गोल झाले असते, तर पहिल्याच सत्रात अर्जेंटिनाने ४-० अशी मजबूत पकड मिळवली असती.