खडीसाखरेचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती नसतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 04:16 PM2018-11-01T16:16:40+5:302018-11-01T16:29:54+5:30

खडीसाखरेला रॉक शुगरही म्हटलं जातं. साखरेच्या गोठलेल्या कणांणाच खडीसाखर म्हटलं जातं. यांच उत्पादन मुख्यत: भारतात आणि पर्शियामध्ये होतं. याता वापर हॉटेल्समध्ये जेवण झाल्यावर देण्यासाठी केला जातो. घराघरातही आवडीने खडीसाखर खाते. याची चव गोड असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत खडीसाखर आवडते. बरं केवळ ही चवीला गोडच नाही तर याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे होतात.

१) खोकल्यापासून आराम - घशात खवखव होत असेल किंवा खोकला आला असेल तर खडीसाखर खाल्याने लगेच आराम मिळतो. खडीसाखरेचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवा. याने खोकला लगेच दूर होईल. लहान मुलांनाही सर्दी-खोकला झाला असेल तर हे देऊ शकता. खडीसाखर पाण्यात विरघळवून ते पाणीही तुम्ही पिऊ शकता.

२) गरमीपासून सुटका - खडीसाखरेत गोडवा असण्यासोबतच थंडावाही असतो. तापवणाऱ्या उन्हात खडीसाखरेचा वापर थंड पेय तयार करण्यासाठीही केला जातो. एक ग्लास पाण्यात खडीसाखर मिश्रित करुन प्यायल्यास शरीराला आराम मिळण्यासोबतच एनर्जीही मिळते.

३) हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो - असे मानले जाते की, गरम दुधामध्ये केसर आणि खडीसाखर मिश्रित करुन प्यायल्यास शरीरात शक्ती आणि स्फूर्ति येते. सोबतच शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. याने त्वचेलाही फायदा होतो.

४) हात आणि पायांची जळजळ दूर होते - लोणी आणि खडीसाखर समान प्रमाणात मिश्रित करुन लावल्यास हात आणि पायांची जळजळ दूर होते. दोन्ही पदार्थ हे थंडावा देणाऱ्या मानल्या जातात.

५) तोंडातील फोडं दूर करण्यासाठी - तोंडात फोडं आले असतील तर खडीसाखरेत वेलची मिश्रित करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट फोडांवर लावल्याने लगेच आराम मिळेल.