Shadab Khan Catch Video, Pakistan vs New Zealand: जबरदस्त! शादाब खानने हवेत उडी मारून टिपला भन्नाट झेल, फलंदाजही झाला आश्चर्यचकित

Shadab Khan Catch Video, Pakistan vs New Zealand: सामना जरी न्यूझीलंडने जिंकला असला तरी पाकिस्तानच्या शादाब खानने घेतलेल्या कॅचची जास्त चर्चा रंगली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 02:51 PM2024-04-26T14:51:55+5:302024-04-26T14:52:22+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan Shadab Khan takes superb catch vs New Zealand as Video goes Viral | Shadab Khan Catch Video, Pakistan vs New Zealand: जबरदस्त! शादाब खानने हवेत उडी मारून टिपला भन्नाट झेल, फलंदाजही झाला आश्चर्यचकित

Shadab Khan Catch Video, Pakistan vs New Zealand: जबरदस्त! शादाब खानने हवेत उडी मारून टिपला भन्नाट झेल, फलंदाजही झाला आश्चर्यचकित

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shadab Khan Catch Video, Pakistan vs New Zealand: पाकिस्तान विरूद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडने ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना टीम रॉबिनसनच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने ७ बाद १७८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना फखर झमानने अर्धशतक ठोकले पण पाकिस्तानला चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सामना जरी न्यूझीलंडने जिंकला असला तरी पाकिस्तानच्या शादाब खानने घेतलेल्या कॅचची जास्त चर्चा रंगली.

इफ्तिखार अहमद १४व्या षटकात गोलंदाजी करत होता आणि मार्क चॅपमन स्ट्राईकवर होता. मार्कने चौथ्या चेंडूवर उत्कृष्ट शॉट खेळला. शॉट खूप वेगवान होता आणि चेंडू सीमारेषा ओलांडून जाईल असे वाटत होते. पण ३० यार्डच्या सर्कलमध्ये कव्हर्स एरियात उभ्या असलेल्या शादाब खानने भन्नाट कामगिरी केली. शादाबने जबरदस्त डाईव्ह घेत झेल टिपला. शादाबचा झेल पाहून चॅपमनलादेखील विश्वास बसला नाही. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, सामन्यात न्यूझीलंडकडून टीम रॉबिनसनने ३६ चेंडूत ५१ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. डीन फॉक्सक्रॉफ्ट (२६ चेंडूत ३४) आणि टॉम ब्लंडेल (१५ चेंडूत २८) यांनीही फटकेबाजी करत संघाला १७८ धावांपर्यंत मजल मारून दिली. पाककडून अब्बास अफ्रिदीने २० धावांत सर्वाधिक ३ बळी घेतले. आव्हानाचा पाठलाग करताना फखर झमानने ४५ चेंडूत ६१ धावांची झुंजार खेळी केली. इफ्तिखार अहमद (२० चेंडूत २३) आणि इमाद वसीम (११ चेंडूत २२*) या दोघांनीही चांगला खेळ केला. न्यूझीलंडच्या विल ओ'रूरकेने २७ धावांत ३ बळी घेतले. त्यालाच सामनावीराचा किताब मिळाला.

Web Title: Pakistan Shadab Khan takes superb catch vs New Zealand as Video goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.