मुंबईचा प्रसिद्ध इव्हेंट मॅनेजर, आयुष्यातील 'प्रेमाचा इव्हेंट' हरला; पंकज कांबळीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 10:40 AM2020-12-11T10:40:25+5:302020-12-11T10:49:39+5:30

Pankaj Kambli Suicide in Indore: चार कंपन्या, गिनिज बुकात नाव, खात्यात १ कोटी...हॉटेलमध्ये 'I Love U' लिहून उद्योजकाने आयुष्य संपवले

मुंबईचे तरुण उद्योजक पंकज कांबळे यांच्या आत्महत्येमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेच्या दोन दिवसांनी अनेक गोष्टी समोर येत आहेत. पंकज यांनी प्रेमातून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

पंकज हे ३१ व्या वर्षी ४ कंपन्यांचे मालक होते. तसेच त्यांचे नाव गिनिज बुकमध्येही होते. सुसाईड नोटमध्ये खात्यात १ कोटी रुपये असल्याचा उल्लेख आहे. सोबतच एका मुलीचा उल्लेख असून पोलीस आता या दिशेने तपास करत आहेत.

पंकज यांनी इंदौरच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये गळफास लावून आयुष्य संपविले आहे. हे प्रकरण इंदौरच्या कनाडिया पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात घडले आहे. काँग्रेस आमदार संजय शुक्ला यांच्या लग्नसमारंभासाठी टीम घेऊन आलेले पंकड कांबळे हे लग्न झाल्यानंतर हॉटेलमध्ये गेले होते.

त्यांचे सहकारी सकाळी हॉटेलमध्ये गेले तेव्हा त्यांना पंकज मृतावस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. प्राथमिक तपासात पंकज यांनी प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. ते सांताक्रूझमध्ये राहणारे आहेत.

एएसपी राजेश सिंह रघुवंशी यांनी सांगितले की, इंदौरच्या बॉम्बे हॉस्पिटलच्या समोर हॉटेल ग्लोडी पॅलेस आहे. येथे मुंबईच्या पंकज कांबळे यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी घरच्यांना मेसेज केला होता. त्यामध्ये घरातील काही घडामोडींवर भाष्य केले आहे.

मात्र, रघुवंशी यांनी हॉटेलच्या खोलीमध्ये सुसाईड नोट व प्रेमप्रसंगातून आत्महत्या केल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. मात्र, एनबीटीला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे.

खोलीतून मिळालेल्या चिठ्ठीमध्ये एका मुलीच्या नावाच उल्लेख आहे. डायरीमध्ये "I Love YOU..." असे लिहिलेले आहे. तसेच खात्यामध्ये १ कोटी रुपये असल्याचेही त्यांनी लिहिले आहे. आत्महत्येची माहिती मिळताच पंकजचे कुटुंबीय इंदौरला पोहोचले आहेत.

पंकजचे चुलत भाऊ बेनी प्रसाद यांनी सांहिकले की, पंकज इंदौरला इव्हेंट मॅनेजमेंटसाठी आला होता. तो चार कंपन्यांचा मालक आहे. लग्नावेळी तब्येत बरी नसल्याचे कारण सांगून तो हॉटेलमध्ये परतला होता. सकाळी पंकजचा मृतदेह फास लावलेला आढळला.

पंकज हे २८ वर्षांच्या वयातच चार मोठ्या कंपन्या आणि एका ट्रेनिंग अकादमीचे मालक बनले होते. गिनिज बुकमध्येही त्यांचे नाव नोंद आहे.

पंकज प्लेअर बार टेंडर देखील होता. १५ मिनिटांत १२० प्रकारचे मॉकटेल मिक्स करून गिनिज बुकमध्ये विक्रम केला होता.

पंकजवरच त्याचे कुटुंब अवलंबून होते. त्याची आई आणि छोटा भाऊ नागपूरमध्ये राहतात. देशातील अनेक भागांत तो इव्हेंट करत होता. त्याचे काम खूप सुंदर होते. त्याचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर आहेत.

Read in English