चित्तथरारक! बस पुलावरून नदीत कोसळली; प्रवाशांचे असे वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 03:58 PM2021-07-09T15:58:14+5:302021-07-09T16:40:26+5:30

Accident : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये कोसळणाऱ्या पावसादरम्यान वेगाने खाली येणारी रोडवेज बस नियंत्रणाबाहेर गेली आणि पुलावरून खरसरत सरळ नदीत कोसळली.

या अपघातादरम्यान रोडवेज बसमधील प्रवासी धसक्यातून सावरत आहेत. अपघात पाहून ग्रामस्थांची गर्दी घटनास्थळी जमली. बसमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढले जात आहे, दुसरीकडे माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. (All Photo - Aaj Tak)

कानपूरच्या बिल्हौरमधील जीटी रोडवर हा अपघात झाला. मुसळधार पाऊस पडत असल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान प्रवाशांसह कानपूरहून येणारी बस अचानक अनियंत्रित झाली. येथून बस येत असताना नदीत कोसळली. या अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये मदतीसाठी आरडाओरडा केला. अपघात पाहून धाव घेतलेल्या ग्रामस्थांनी केवळ पावसात शिडी लावून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यास सुरवात केली.

या अपघातादरम्यान प्रवासी खूप घाबरले. बसमधून बाहेर पडण्यासाठी कोणीतरी काचेच्या खिडक्या तोडून, तर कोणी नदीत उडी मारून आपला जीव वाचविला. मात्र, यावेळी महिला असहाय्य झाल्या.

बस नदीत कोसळू नये म्हणून बसच्या एका टोकाला ग्रामस्थांनी दोरीने बांधले होते. यासह, महिलांना बाहेर काढण्यासाठी शिडी वापरली गेली, जेणेकरून त्यांना सुरक्षित बाहेर काढता यावे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

सुदैवाने नदीत पाणी कमी होते, त्यामुळे सर्व प्रवाशांना बसमधून सहज बाहेर काढता आले.