रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 09:07 PM2024-05-05T21:07:44+5:302024-05-05T21:15:42+5:30

PM Narendra Modi Ayodhya Road Show after Ram Mandir Visit: प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज पहिल्यांदाच अयोध्येला भेट दिली. त्यांनी सर्वप्रथम रामललाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर रोड शो सुरु केला.

pm narendra modi seeks blessings of Ram Lalla in Ram Mandir then roadshow in ayodhya for Bjp Candidate | रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय

रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय

PM Narendra Modi Ayodhya Road Show after Ram Mandir Visit: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी पंतप्रधाननरेंद्र मोदी आज अयोध्येत पोहोचले. यावर्षी जानेवारीत रामजन्मभूमी मंदिरात रामललाच्या अभिषेक सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज पहिल्यांदाच अयोध्येला भेट दिली. पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम रामललाचे दर्शन घेतले. यानंतर तो रोड शो सुरु केला. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहिले. रोड शो दरम्यान पीएम मोदींच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले, "अयोध्येतील लोकांचे मन भगवान श्रीरामाइतकेच मोठे आहे. रोड शो मध्ये आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या जनतेचे आभार!"

भाजपा उमेदवार लल्लू सिंह यांच्या समर्थनार्थ रोड शो

फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार लल्लू सिंह यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी रोड शो करत आहेत. अयोध्येत 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, "राम मंदिरासाठी लाखो लोकांनी संघर्ष केला. कुठेही इतका मोठा संघर्ष झाला नसता, पण ते अयोध्येत घडले. तुमच्या मतांच्या बळावरच आज राम मंदिर उभारले." पंतप्रधान मोदी सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. दररोज ते देशाच्या विविध भागात रोड शो आणि निवडणूक सभांना संबोधित करत आहेत. याचाच एक टप्पा म्हणून रविवारी ते अयोध्येत आले.

अयोध्येतून कोणाला उमेदवारी?

फैजाबादमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. येथे 20 मे रोजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात मोहनलालगंज, लखनौ, रायबरेली, अमेठी, जालौन, झाशी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर, कौशांबी, बाराबंकी, कैसरगंज आणि गोंडा येथेही मतदान होणार आहे. बसपने अयोध्येतून (फैजाबाद लोकसभा मतदारसंघ) उमेदवार म्हणून ब्राह्मण समाजातील उमेदवार दिला आहे. बसपमध्ये प्रवेश केल्यानंतर मायावतींनी अयोध्येतून आंबेडकर नगरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सच्चिदानंद पांडे 'सचिन' यांना तिकीट दिले आहे. दुसरीकडे भाजपाने या जागेवर लल्लू सिंह यांना उमेदवारी दिली. तर अवधेश प्रसाद यांना समाजवादी पक्ष-काँग्रेस आघाडीने विश्वास व्यक्त केला आहे.

Web Title: pm narendra modi seeks blessings of Ram Lalla in Ram Mandir then roadshow in ayodhya for Bjp Candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.