लग्नाच्या दिवशीच बॉयफ्रेन्डसोबत पळून गेली नवरी, पोलीस स्टेशनमध्ये रडत बसला नवरदेव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 11:08 AM2021-06-30T11:08:13+5:302021-06-30T11:18:29+5:30

वाराणसीच्या चौबेपूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील ही घटना आहे. धनगर वस्ती काही दिवसांपूर्वी जौनपूरच्या मुफ्तीगंजमधून वरात आली होती.

उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे लग्नाच्या दिवशीच नवरी तिच्या प्रियकरासोबत फरार झाली. सायंकाळी वरात जेव्हा नवरीच्या घरी आली, तेव्हा या घटनेचा खुलासा झाला.

त्यानंतर नवरी आणि तिच्या प्रियकराला शोध घेण्यात आला आणि पोलिसांनी दोघांनाही पकडलं. मात्र, नवरदेवाच्या सर्व अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं.

वाराणसीच्या चौबेपूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील ही घटना आहे. धनगर वस्ती काही दिवसांपूर्वी जौनपूरच्या मुफ्तीगंजमधून वरात आली होती. अशात खुलासा झाला की, नवरी तर तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. ही घटना समोर येताच वरातींचा सगळा जोश थंड झाला.

नवरी अशाप्रकारे लग्नाच्या दिवशीच पळून गेल्याने कुटुंबीयांनाही बदनामी होण्याची भीती सतावत होती. तिकडे नवरदेवाकडील लोक चिंतेत होते की, नवरी न घेता घरी परत गेले तर समाजात त्यांचीही आब्रू जाईल. दोन्हीकडील चिंतेच्या वातावरणात नवरीचा शोध सुरू करण्यात आला.

बरीच शोधाशोध केल्यानंतर जेव्हा नवरीबाबत माहिती मिळाली तर पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेता नवरी आणि तिच्या प्रियकराला पकडलं. पोलीस त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले.

तेच जेव्हा याची माहिती नवरदेवाकडील लोकांना लागली तर नवरदेव नातेवाईकांसोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला.

तो पोलिसांना लग्न लावून देण्याची विनंती करत रडू लागला. मात्र, त्याची इच्छा पूर्ण होऊ न शकल्याने त्याला तसंच घरी परतावं लागलं.

पोलीस अधिकारी राजेश त्रिपाठी म्हणाले की, मुलगी अल्पवयीन असण्यासोबतच तिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मुलीचं मेडिकल करून तिला आशा ज्योती केंद्रात पाठवलंय. तर तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली.

मुलीचे कुटुंबीय आणि नवरदेवाकडील लोक पोलिसांकडे मुलीला सोडण्याची मागणी करत होते. पण ते काही शक्य होऊ शकलं नाही. कारण कुटुंबीयांनुसार मुलगी अल्पवयीन आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.