मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 02:20 PM2024-05-18T14:20:29+5:302024-05-18T14:26:08+5:30

मंगळाच्या रुचक राजयोगाचे काही राशींना शुभ फल मिळू शकते, असे सांगितले जात आहे.

नवग्रहांचा सेनापती आणि पराक्रमी ग्रह मानला जाणारा मंगळ सुमारे २४ दिवसांनी राशीपरिवर्तन करतो. आताच्या घडीला मंगळ मीन राशीत आहे. जून महिन्यात मंगळ मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष रास ही मंगळाची रास मानली जाते. ०१ जून रोजी मंगळ स्वराशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करेल.

मंगळ ग्रह जेव्हा मकर राशीत किंवा स्वराशीत म्हणजेच मेष किंवा वृश्चिक राशीत विराजमान होतो, तेव्हा रुचक राजयोग तयार होतो. मंगळाचा रुचक राजयोगाच्या प्रभावाने प्रतिष्ठा वाढते. आक्रमकपणा, धाडसीपणा वाढतो. संपत्तीच्या अपार संधी प्राप्त होतात. कामाबद्दल खूप आदरही मिळतो, असे सांगितले जाते.

मंगळाचा रुचक राजयोग काही राशींना उत्तम फलदायी, लाभदायी आणि यश, प्रगती साध्य करणारा ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. मंगळाच्या रुचक राजयोगाचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...

मेष: विशेष लाभ मिळू शकतो. करिअर क्षेत्राबद्दल बोलायचे झाल्यास, गोष्टी खूप चांगल्या असतील. चांगल्या प्रगतीसह पदोन्नती होऊ शकते. व्यवसायात एखाद्या डीलमुळे भरपूर नफा मिळू शकतो. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडून आर्थिक लाभ होईल. आरोग्यही चांगले राहील.

वृषभ: फायदा होऊ शकेल. खूप दिवसांपासून प्रलंबित असलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीचे फळ करिअरमध्येही मिळेल. प्रगती आणि पदोन्नतीसह चांगले मूल्यांकन मिळेल. पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. व्यवसायात भरपूर फायदा होणार आहे. पैशाच्या बाबतीत थोडे सावध राहण्याची गरज आहे.

कर्क: फायदा होऊ शकेल. केलेले प्रयत्न आता फळाला येतील. करिअरमध्ये बरेच फायदे मिळतील. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. यासोबतच सहकारी आणि वरिष्ठांच्या मदतीने ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. एखादा मोठा प्रकल्प, करार किंवा ऑर्डर मिळू शकते. यातून भरपूर नफा मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. वैवाहिक जीवनातही आनंद राहील. आत्मविश्वास वाढेल.

सिंह: शुभ लाभ मिळू शकेल. नशिबाची साथ लाभेल. अनेक गोष्टी साध्य होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. व्यवसायात भरपूर पैसे कमावण्याची संधी मिळेल. नोकरदारांना आर्थिक लाभ मिळतील. पदोन्नती मिळू शकेल.

धनु: परदेशात जाण्याची योजना असल्यास संधी मिळू शकेल. करिअरमध्ये प्रगती होऊ शकेल. रखडलेल्या व्यवसाय योजना सुरू होऊ शकतील. पैसे कमविण्याचे मार्ग सापडू शकेल. पैशाची बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.