कोण आहेत निकेश अरोरा? कमाईच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर, सुंदर पीचाईंसह मार्क झुकेरबर्गनाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 01:32 PM2024-05-25T13:32:37+5:302024-05-25T13:47:45+5:30

जगभरात भारतीय वंशाच्या नागरिकांचा दबदबा वाढतानाच दिसतोय. वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपन्यांची धुरा भारतीय वंशाचे नागरिक मोठ्या जबाबदारीने सांभाळताना दिसत आहेत.

भारतीय वंशाचे नागरिक गुगल मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्यांचे नेतृत्व ते उत्तमरित्या करत आहेत. अर्थातच त्यांची कमाई देखील तितकीच आहे.

आतापर्यंत गुगलचे सीईओ सुंदर पीचाई यांच्या कमाईची सगळीकडे होती. त्यात आता कमाईचा नवा विक्रम टेक सीईओ निकेश अरोरा यांच्या नावावर करण्यात आला आहे. जगातील सर्वात श्रीमंत कम्युनिटीमध्ये या भारतीय वंशाच्या व्यक्तीचा समावेश आहे.

निकेश अरोरा यांच्या नावावर यापूर्वीही अनेक विक्रम आहेत. त्यात आता अरोरा यांच्या नावावर एक नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. वॉल स्ट्रिट जर्नलच्या आकडेवारीतून अरोरा हे २०२४ सालचे पहिले अब्जाधीश असल्याची माहिती समोर आली आहे.

निकेश अरोरा हे २०२४ सालचे पहिले अब्जाधीश बनले आहेत. एकेकाळी गुगलचे सर्वाधिक महागडे कर्मचारी अशी त्यांची ओळख बनली होती.

त्यांनी कमाईच्या बाबतीत गुगलचे सीईओ सुंदर पीचाईंसह मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना देखील मागे टाकलं आहे.

बड्या कंपनींमध्ये काम करत निकेश अरोरा यांनी आपली वेगळा असा ठसा उमटवला आहे. सध्या ते पाओ अल्टो नेटवर्क्स या सायबर सुरक्षा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.

अमेरिकेच्या बोस्टमनमधील नॉरथइस्टर्न युनिव्हर्सिटीमधून त्यांनी एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. तसेच त्यांनी बोस्टन कॉलेजमधून एमएची पदवी प्राप्त केली आहे. पाल्टो आल्टोमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी गुगल तसेच सॉफ्टबॅंकसारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे.

वॉल स्ट्रिट जर्नलनुसार, युएईमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या नागरिकांच्या यादीमध्ये त्यांच नाव दुसऱ्या क्रमांवर आहे. अरोरा यांची एकूण नेटवरर्थ १५.१४ करोड असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय चलनात ही रक्कम १२५७ कोटी रुपये इतकी आहे.

या श्रीमंतांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर ब्रॉडकॉमचे सीईओ हॉक टेन यांच नाव येतं. त्यांची एकूण नेटवर्थ १६.२ करोड डॉलर इतकी आहे.

त्याचबरोबर गुगलचे सीईओ सुंदर पीचाई यांची एकुण संपत्ती ८८ लाख डॉलर आहे. तर मार्क झुकेरबर्ग यांची संपत्ती २.४४ करोड डॉलर असल्याची अहवालातून स्पष्ट झालं आहे.