SIP सोबत टॅक्स सेव्हिंग! ३ वर्षांत ५हजारांची गुंतवणूक झाली २.६ लाखांपर्यंतचा फंड, पाहा टॅाप ३ स्कीम्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 09:42 AM2023-08-05T09:42:00+5:302023-08-05T09:52:15+5:30

SIP Tax Saving Mutual Funds: जेव्हा जेव्हा आपण टॅक्स वाचवण्यासाठी पर्यायांबाबत चर्चा करतो, तेव्हा त्यात ELSS हे सर्वात कमी लॉक-इन पीरिअड असलेला प्रोडक्ट आहे.

SIP Tax Saving Mutual Funds: म्युच्युअल फंडाचा इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स (ELSS) हा असाच एक पर्याय आहे ज्यात चांगला परतावाही मिळतो आणि टॅक्स सेव्हिंगही होतं. ELSS मधील गुंतवणुकीद्वारे, तुम्ही एका आर्थिक वर्षात आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा क्लेम करू शकता.

जेव्हा जेव्हा आपण टॅक्स वाचवण्यासाठी पर्यायांबाबत चर्चा करतो, तेव्हा त्यात ईएलएसएस हे सर्वात कमी लॉक-इन पीरिअड असलेला प्रोडक्ट आहे. ईएलएसएस मधील गुंतवणूक 3 वर्षांपर्यंत रिडीम केली जाऊ शकत नाही.

ईएलएसएस फंडांच्या परताव्याबद्दल बोलायचं झाल्यास, 3 स्कीम्सचा सरासरी एसआयपी रिटर्न वार्षिक २४ टक्के आहे. यामध्ये, मासिक 5000 गुंतवणुकीसह, 3 वर्षात, 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त निधी जमा होण्यास मदत झाली.

Quant Tax Plan - क्वांट टॅक्स प्लॅनचे गेल्या 3 वर्षातील वार्षिक एसआयपी रिटर्न्स 25.59 टक्के आहेत. यामध्ये जर 3 वर्षांपूर्वी 5,000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली असेल, तर आज त्यांचा कॉर्पस जवळपास 2.64 लाख रुपये झाला असेल. या योजनेत किमान 500 रुपयांची गुंतवणूक करावी लागते.

Bandhan Tax Advantage (ELSS) Fund - बंधन टॅक्स अॅडव्हांटेज (ELSS) फंडाचे गेल्या 3 वर्षांतील वार्षिक एसआयपी रिटर्न 22.56 टक्के आहेत. यामध्ये जर 3 वर्षांपूर्वी 5,000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली असती तर आज त्यांचा कॉर्पस सुमारे 2.49 लाख रुपये झाला असता. या योजनेत किमान गुंतवणूक 500 रुपयांची आहे. तर किमान एसआयपी 1000 रुपये आहे.

HDFC Taxsaver Fund - एचडीएफसी टॅक्स सेव्हर फंडचे गेल्या 3 वर्षातील वार्षिक एसआयपी रिटर्न 21.01 टक्के प्रतिवर्ष आहे. यामध्ये त्यांनी 3 वर्षांपूर्वी 5,000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली असेल तर आज त्यांचा निधी सुमारे 2.44 लाख रुपये झाला असेल. या योजनेत किमान गुंतवणूक 500 रुपयांची आहे आणि किमान एसआयपी 500 रुपये आहे. (एनएव्ही - 15 जून 2023, सोर्स - AMFI)

ELSS फंड म्हणजे काय? - इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) हा एक डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड आहे. गुंतवणुकीचा बहुतांश हिस्सा इक्विटीमध्ये असतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामधील गुंतवणुकीतून इन्कम टॅक्स कलम 80C अंतर्गत (Section 80C) तुम्ही 1.50 लाख रुपयांपर्यंत टॅक्स डिडक्शनचा क्लेम करू शकता.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीमचा लॉक-इन कालावधी तीन वर्षांचा असतो. हा फंड डायव्हर्सिफाईड असल्यानं त्यातील जोखीम कमी आहे. यात एसआयपीद्वारेही गुंतवणूक करता येते. ईएलएसएसमध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. AMFI डेटानुसार, मे 2023 मध्ये, ईएलएसएसमध्ये सुमारे 505 कोटी रुपयांचा आऊटफ्लो पाहायला मिळाला होता.

(टीप - यामध्ये म्युच्युअल फंडांविषयी सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा जाणाकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)