२४,४०० टक्क्यांचा छप्परफाड रिटर्न दिल्यानंतर आता ९ हजारांपार जाणार TATA समुहाचा हा कोट्यधीश स्टॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 04:39 PM2022-06-13T16:39:59+5:302022-06-13T16:45:52+5:30

Stock to buy tata group: टाटा समूहाचा एक शेअर ज्याने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. दीर्घकाळात, या शेअरनं आपल्या गुंतवणूकधारकांना कोट्यधीश बनवले आहे.

Stock to buy tata group: टाटा समूहाचा एक शेअर असाही आहे ज्याने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. दीर्घकाळात, या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते या शेअरच्या किंमतीत आण हा शेअर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या शेअरचे नाव आहे - Tata Elxsi Limited (TEL). टाटांच्या या कंपनीचं मार्केट कॅप 53,547.15 कोटी रुपये इतकं आहे. Tata Elxsi चे शेअर्स गेल्या एका वर्षात ₹ 3809.60 वरून ₹ 8,576 पर्यंत वाढले आहेत.

या कालावधीत, या शेअरने एका वर्षात 125.12 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. 2022 मध्ये आतापर्यंत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 45.51 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, या शेअरचे मॅक्सिमम रिटर्न्स 24,400.14 टक्के आहे.

शेअरखानने टाटा इलेक्सीच्या शेअर्सला बाय कॉल रेटिंग दिले आहे. शेअरखानने या शेअरची टार्गेट प्राईज 9,750 रुपये ठेवली आहे. सध्या या शेअरची किंमत 8,583.35 रुपये आहे. म्हणजेच, यात सुमारे 14 टक्क्यांचा नफा होऊ शकतो.

टाटा इलेक्सीच्या वार्षिक रिपोर्टने सेलेक्टिव्ह इंडस्ट्रीत आपली ऑफर्स आणि डिझाईनच्या नेतृत्वाच्या दृष्टीकोनावर लक्ष केंद्रित केलं आहे. ग्राहक आधारित प्लॅटफॉर्म व्यवसाय, डिलिव्हरी कॅपेबिलिटीवर त्यांनी लक्ष केल्याचं शेअरखाननं एका नोटमध्ये म्हटलंय.

भारतीय ईआरडी सेवा प्रदात्यांचा हिस्सा 2021 मध्ये 16 बिलयन डॉलर्सवरून वाढून 2031 मध्ये 58 बिलियन डॉलर्स होण्याची अपेक्षा आहे. जे 13 टक्के सीजीआरपेक्षा अधिक आहे. डिजिटल इंजिनिअरिंगच्या नेतृत्वाखालील सेवांची विस्तृत श्रृंखला, मजबूत प्लॅटफॉर्म पोर्टफोलिओ, ठोस ऑफशोअर डिलिव्हरी क्षमता पाहता टाटा इलेक्सीच्या शेअर्समध्ये तेजी येईल, असंही त्यांनी म्हटलंय. (टीप- कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि या क्षेत्रातील जाणकारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)