नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर 'नोटीस पीरियड' द्यावाच लागतो का?, जाणून घ्या नियम काय सांगतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 11:10 AM2023-01-22T11:10:41+5:302023-01-22T11:21:11+5:30

नोकरदार वर्गातील कर्मचारी जेव्हा नोकरी बदलण्याच्या कारणास्तव वर्तमान कंपनीत आपला राजीनामा सादर करतो, त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला नोटिस पीरियड सर्व्ह करावा लागतो. नोटिस पीरियडचा नियम जवळपास सर्वच कंपन्यांमध्ये आहे. पण यासाठी काही अटी आणि शर्थी देखील आहे. कोणत्याही कंपनीत नोटीस पीरियड सर्व्ह करणं गरजेचं का असतं? आणि कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी हे अत्यंत महत्वाचं का असतं? हे जाणून घेऊयात.

नोटीस पीरियडच्या नियमांचं पालन न केल्यास कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी आर्थिक तोटा देणारं आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही कंपनीत नोकरीवर रुजू होता जेव्हा तुमच्याकडून वेगवेगळ्या कागदपत्रांवर तुमची स्वाक्षरी घेतली जाते.

यात कंपनीच्या पॉलिसीनुसार काम करण्याची अटही समावेश असतो. यातच तुमच्या नोटिस पीरियडबाबतचीही माहिती नमूद असते.

कागदपत्रांमध्ये नोटीस पीरियड संदर्भात सर्व माहिती नमूद असते. जसं की निश्चित कालावधीपेक्षा कमी नोटीस पीरियड सर्व्ह करावा लागत असेल त्यासाठी काय नियम आहे. तसंच नोटीस पीरियड सर्व्ह करायचा नसेल तर त्यासाठी काय नियम आहे, अशी सर्व माहिती नमूद असते.

नोटीस पीरियडचा कोणताही निश्चित नियम नाही. प्रत्येक कंपनी कॉन्ट्रॅक्ट पॉलिसीमध्ये याचा उल्लेख करत असते. सामान्यत: अस्थायी कर्मचाऱ्यांसाठीची नोटीस पीरियडचा कालावधी १५ दिवस ते एक महिना इतका असतो. तर स्थायी स्वरुपातील कर्मचाऱ्यांसाठी नोटीस पीरियड ए ते तीन महिने इतका असतो.

नोकरीवर रुजू होतानाच जर तुम्ही नोटीस पीरियडच्या कॉन्ट्रॅक्टवर स्वाक्षरी केली असेल तर कंपनीच्या पॉलिसीचं पालन करणं महत्वाचं आहे. कोणतीही कंपनी कर्मचाऱ्यावर नोटीस पीरियडचं पालन करण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. कॉन्ट्रॅक्टमध्ये नोटीस पीरियड सर्व्ह न करण्याबाबतही सामान्यत: अटींचा उल्लेख केलेला असतो.

नोटीस पीरियडच्या मोबदल्यात तुम्हाला सुट्ट्या बहाल करण्याचाही नियम असतो. याशिवाय नोटीस पीरियडच्या कालावधीच्या मोबदल्यात पैसे भरण्याचाही पर्याय असतो.