आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
1 / 7LIC Mutual Fund: दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक गुंतवणुकीबाबत अधिक जागरूकता झाले आहेत. भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी लोक आता नियोजनबद्ध गुंतवणुकीकडे वळत आहेत. मात्र, योग्य माहितीशिवाय गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत LIC Mutual Fund च्या काही योजनांनी दीर्घकालीन कालावधीत चांगला परतावा दिल्याने त्या गुंतवणूकदारांसाठी आकर्षक पर्याय ठरत आहेत.2 / 7LIC च्या प्रायोजकत्वाखाली २० एप्रिल १९९४ रोजी स्थापन झालेल्या या फंड हाऊसने इक्विटी आणि डेट अशा दोन्ही प्रकारांत विविध योजना सुरू केल्या आहेत. Association of Mutual Funds in India (AMFI) नुसार, याची ट्रस्टी कंपनी LIC Mutual Fund Trustee Private Ltd. असून, एसेट मॅनेजमेंट कंपनी LIC Mutual Fund Asset Management Limited आहे.3 / 7१) दीर्घकालीन गुंतवणुकीत उत्तम परतावा देणाऱ्या पाच प्रमुख योजनांचा आढावा घेतल्यास, पहिल्या क्रमांकावर LIC MF इन्फ्रास्ट्रक्चर फंड येतो. या योजनेने मागील दहा वर्षांत सरासरी १८.५१ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. या योजनेचा NAV सध्या ६०.०८ रुपये असून, दरमहा १०,००० रुपयांची SIP केल्यास दहा वर्षांत सुमारे ३४.७३ लाख रुपयांचा निधी तयार झाल्याचे दिसते. 4 / 7२) दुसऱ्या क्रमांकावर LIC MF लार्ज अँड मिड कॅप फंड आहे. या योजनेने दहा वर्षांत १६.१८ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. सध्याचा NAV ४३.११ रुपये असून १०,००० रुपयांच्या मासिक SIPमधून सुमारे २९.९८ लाख रुपये तयार झाले असते. 5 / 7३) तिसऱ्या क्रमांकावर LIC MF निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स फंड येतो. या योजनेने मागील दहा वर्षांत १४.४१ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. या योजनेचा NAV ५७.६२ रुपये असून १०,००० रुपयांच्या SIPमधून दहा वर्षांत सुमारे २६.८७ लाख रुपये जमा झाले असते. 6 / 7४) चौथ्या क्रमांकावर LIC MF निफ्टी १०० ETF ही योजना आहे. या योजनेने दहा वर्षांत १३.१० टक्के वार्षिक परतावा दिला असून सध्याचा NAV २७१.९८ रुपये आहे. १०,००० रुपयांच्या SIPमधून सुमारे २४.८१ लाख रुपये तयार झाले असते. 7 / 7५) पाचव्या क्रमांकावर LIC MF निफ्टी ५० ETF योजना आहे. या योजनेने मागील दहा वर्षांत १३.०५ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. या योजनेचा NAV २६७.४६ रुपये असून १०,००० रुपयांच्या SIPमधून सुमारे २४.७४ लाख रुपयांचा निधी तयार झाला असता. (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)