अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करणारे झाले मालामाल, पाहा गेल्या 12 वर्षांचा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 04:12 PM2024-05-08T16:12:54+5:302024-05-08T16:18:08+5:30

Gold Price on Akshaya Tritiya: गेल्या वर्षभरात सोन्यातील गुंतवणूकीने 14000 रुपयांचा नफा मिळवून दिला आहे.

Gold Price on Akshaya Tritiya: हिंदू कॅलेंडरप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. यापैकी अक्षय्य तृतीयेचा दिवस खुप खास असतो. या दिवशी सोनं खरेदी करणे अतिशय खूप शुभ मानले जाते. या दिवशी बरेचजण एखादे नवीन काम सुरू करतात किंवा सोनं खरेदीदेखील करतात.

"अक्षय" चा शब्दशः अर्थ शाश्वत किंवा अविनाशी असा होतो. त्यामुळे या दिवशी केलेली खरेदी किंवा गुंतवणूक कायम तुमच्यासोबत राहते, असा अनेकांचा विश्वास आहे. आकडे बघितले तर, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेल्या सोन्याने अनेकांना चांगला परतावा दिला आहे.

केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया यांनी सांगितले की, गेल्या वर्षी 21 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेला ज्याने सोने खरेदी केले, त्यांना वर्षभरात उत्कृष्ट परतावा मिळाला. 21 एप्रिल 2023 रोजी सोन्याचा भाव 59845 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​होते. जर आजच्या दराशी तुलना केली, तर गुंतवणूकदारांनी सुमारे 14000 रुपयांचा नफा मिळवला आहे.

गेल्या 12 वर्षांच्या सराफा बाजाराच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर 2011 च्या अक्षय्य तृतीयेपासून 2012 च्या अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्यामध्ये सुमारे 33 टक्क्यांनी वाढ झाली होती. एका वर्षात सोने प्रति 10 ग्रॅम 7184 रुपयांनी वाढून 29030 रुपयांवर पोहोचले. पुढच्या वर्षी 2013 मध्ये फक्त 2.88% परतावा मिळाला.

तर, 6 मे 2019 रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेल्या सोन्याने चांगला परतावा दिला. या दिवशी सोने 31383 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. पुढील वर्षी म्हणजेच 24 एप्रिल 2020 रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी यात 47.41 टक्क्यांनी वाढ झाली आणि दर 46527 रुपयांवर पोहोचला. प्रत्येक दहा ग्रॅमवर ​​सुमारे 15000 रुपये परतावा मिळाला.

तेव्हापासून सोने सतत चांगला परतावा देत आहे. 2021 मध्ये 2.47 टक्के, 2022 मध्ये 6.57 टक्के, 2023 मध्ये सुमारे 18 टक्के आणि या वर्षी आतापर्यंत 20 टक्के परतावा दिला आहे. पण, मधल्या काळात 2014 मध्ये 3.33 टक्के, 2015 मध्ये 6.11 टक्के आणि 2017 मध्ये सुमारे 5 टक्के नुकसानदेखील झाले.