स्वस्तात सोनं खरेदी करता येणार, २३ जून पर्यंत सरकार देतंय संधी; पाहा संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 08:51 AM2023-06-16T08:51:49+5:302023-06-16T09:01:02+5:30

सोनं खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

सोनं खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2023-24 या वर्षासाठी सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेची पहिली सीरिज 19 जूनपासून सुरू होत आहे. 23 जूनपर्यंत तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता.

यात ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे गुंतवणूक करता येते. ऑनलाइन गुंतवणुकीसाठी 50 रुपयांची सूट उपलब्ध आहे.

सॉवरेन गोल्ड बाँडमधील गुंतवणुकीवर वार्षिक 2.50 टक्के व्याज मिळते. याशिवाय या बाँडवरही कर्ज घेता येते. बॉण्डची किंमत इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड अर्थात IBJA च्या दराच्या आधारे ठरवली जाते. RBI नं दिलेल्या माहितीनुसार याची दुसरी सीरिज 11 ते 15 सप्टेंबर 2023 दरम्यान सुरू होईल आणि इश्यू डेट 20 सप्टेंबर असेल

दुसरीकडे अमेरिकन फेड रिझर्व्हच्या निर्णयाचा सोन्याबरोबरच चांदीवरही परिणाम झाला आहे. गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं.

आयबीजेएच्या वेबसाइटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 244 रुपयांनी घसरून 59,020 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याचवेळी 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,062 रुपयांवर गेला आहे.

तर दुसरीकडे चांदी 684 रुपयांनी स्वस्त होऊन 71,421 रुपये प्रति किलो झाली. विशेष म्हणजे 15 महिन्यांनंतरही यूएस फेडरल रिझर्व्हने जूनच्या पतधोरणात अपेक्षेप्रमाणे व्याजदरात बदल केलेला नाही.