एका महिन्यात पैसा डबल! या पेनी स्टॉकनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹8 वर पोहोचला भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 08:56 PM2023-12-10T20:56:58+5:302023-12-10T21:04:08+5:30

गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

शेअर बाजारात युनिटेक लिमिटेडच्या शेअरची सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हा शेअर शुक्रवारी अपर सर्किटवर पोहोचला होता.

युनिटेक लिमिटेडच्या शेअरने शुक्रवारच्या व्यवहारादरम्यान 8.45 रुपयांचा उच्चांक गाठला होता. गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 125 टक्क्यांनी वधारला आहे. अर्थात केवळ एका महिन्यातच या शेअरने गुंतवणूकदारांचा पैसा डबल केला आहे.

दिग्गज गुंतवणूकदार मालामाल - दिग्गज गुंतवणूकदार दिलीप कुमार लखी यांच्याकडे युनिटेक लिमिटेडची 4.69 टक्के एवढी हिस्सेदारी आहे. जी 122,782,004 शेअर एवढी आहे. स्टॉकमधील तेजीनंतर, दिलीप कुमार लखी यांना एकाच दिवसात 4,29,73,701 रुपयांचा परतावा मिळाला आहे.

युनिटेक लिमिटेडने जबरदस्त कामगिरी करत एका महिन्यात 125 टक्के, तर गेल्या तीन महिन्यांत 200 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या स्टॉकने सहा महिन्यांत 455.92% आणि या वर्षात YTD मध्ये 369.44% परतावा दिला आहे.

काय करते कंपनी - युनिटेक इंडिया ही रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करणारी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीने अलीकडेच आपण स्वतः भारतातील सर्वात मोठा रिअल इस्टेट डेव्हलपर असल्याचा दावा केला आहे. ही दिल्ली बेस्ड कंपनी आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)