६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 07:07 IST2026-01-13T07:07:07+5:302026-01-13T07:07:07+5:30

6 Days 5 Grah Gochar Makar Sankranti 2026: मकर संक्रांती, षट्तिला एकादशी, प्रदोष, मासिक शिवरात्रि या व्रतांच्या शुभ काळात ६ दिवसांत ५ ग्रहांचे होणारे गोचर काही राशींना भरभराटीचे, मंगलाचे, कल्याणाचे ठरू शकते, असे सांगितले जात आहे.

जानेवारी २०२६ चा हा आठवडा अतिशय अद्भूत आणि दुर्लभ मानला गेला आहे. या एकाच आठवड्यात अनेक घडामोडी घडत आहेत. केवळ ६ दिवसांत नवग्रहांपैकी तब्बल ५ ग्रहांचे गोचर होणार आहे. या ग्रहांच्या गोचरामुळे शनिचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. या चतुर्ग्रही योगामुळे अनेक राजयोग, शुभ योग जुळून येत आहेत.

१२ जानेवारी २०२६ रोजी शुक्र ग्रहाने मकर राशीत विराजमान झाला आहे. १४ जानेवारी २०२६ रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मंगळ ग्रह मकर राशीत प्रवेश करेल आणि १७ जानेवारी २०२६ रोजी बुध मकर राशीत विराजमान होत आहे. तर या काळात चंद्राचे भ्रमण तूळ, वृश्चिक, धनु राशीतून होणार आहे.

याच काळात धनुर्मास समाप्ती, भोगी, मकर संक्रांती, षट्तिला एकादशी, प्रदोष आणि शिवरात्रि अशी शुभ पुण्य फलदायी व्रतेही आचरली जाणार आहेत. या सोबत होणार ग्रहांचे गोचर सर्वोत्तम लाभाचे, कल्याणाचे, सुखाचे आणि संक्रांत दूर होऊन मंगलाचे सूचक ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. तुमची रास आहे का यात? जाणून घेऊया...

मेष: करिअर, व्यवसायात शुभ आणि फलदायी ठरू शकते. या काळात कामात आणि व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते. या काळात व्यावसायिकांनाही लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतो. नवीन करार होऊ शकतो. नवीन प्रकल्प किंवा व्यवसायात नफा मिळू शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बुद्धी आणि समज तुम्हाला योग्य वेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यास सक्षम करेल.

वृषभ: नशिबाची भक्कम साथ लाभू शकते. व्यवसायात प्रचंड यश मिळू शकेल. कामात यश मिळेल. उत्पन्न वाढेल. नोकरदार व्यक्तींना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. या काळात नोकरी करणाऱ्यांना अधिक पैसे कमविता येतील. दीर्घकाळ रखडलेले प्रकल्प गती घेतील. शेअर आणि लॉटरीमध्ये फायदेशीर संधी निर्माण होऊ शकतात.

मिथुन: हा काळ फायदेशीर ठरू शकतो. या काळात काम आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळू शकते आणि वडिलोपार्जित मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता आहे. हा काळ आर्थिक स्थिरता आणेल. यासोबतच मनात आत्मविश्वासही निर्माण होईल. जोडीदाराकडून पाठिंबा आणि मित्रांकडून चांगली बातमी मिळू शकते. जे व्यावसायिक आहेत त्यांना या काळात चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात.

तूळ: चांगला काळ अनुभवता येईल. या काळात भौतिक सुख सोयींचा अनुभव येऊ शकतो. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. नवीन प्रकल्प आणि योजना यशस्वी होऊ शकतात. याव्यतिरिक्त, या काळात संपत्ती, आदर आणि सामाजिक प्रतिष्ठा, मान-सन्मान वाढीस लागू शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेचा आनंद अनुभवता येईल. कुटुंबातील सदस्यांशी नातेसंबंध सुधारू शकतात. अनेक लाभ प्राप्त करता येऊ शकतात.

धनु: सकारात्मक ठरू शकते. या काळात अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यावसायिकांनाही चांगला नफा मिळेल आणि ते सर्व प्रकारच्या आव्हानांना हुशारीने तोंड देऊ शकतील. या काळात आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि आत्मविश्वास वाढेल. ध्येयांकडे वेगाने वाटचाल कराल. कुटुंब आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल.

मकर: आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. नोकरी किंवा व्यवसायात यश आणि सकारात्मक बदल दिसून येतील. एक अद्भुत वैवाहिक जीवन अनुभवायला मिळेल. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. भावंडांचे सहकार्य लाभेल. गुंतवणूक, भागीदारी किंवा कौशल्य विकासाच्या दिशेने पाऊल उचलणे फायदेशीर ठरेल. नवीन संधी निर्माण होतील. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता.

मीन: ग्रहांचे गोचर शुभ, लाभदायक ठरू शकेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उत्पन्न वाढेल. कुटुंब आणि मित्रांच्या पाठिंब्याने प्रयत्न आणखी फलदायी ठरतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. शेअर बाजार, लॉटरीमधून फायदा होऊ शकतो. विविध लाभ मिळू शकतात. मान-सन्मान, प्रतिष्ठा वाढेल. पैशाचा ओघ वाढेल.

सूर्याचा मकर राशीत प्रवेश होण्याच्या क्षणाला मकर संक्रमण म्हणतात. सूर्याच्या मकर संक्रमणावर आधारलेला एक भारतीय सण. भारतातील बहुतेक सर्व भागांतून हा सण साजरा केला जातो. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थस्नान आणि दान पुण्यदायी मानले आहे. संक्रांतीनिमित्त सौभाग्यवाण लुटतात. तिळगूळ दिले जातात. हा सण माणसांच्या परस्परसंबंधांमध्ये स्नेह व माधुर्य हवे, असा संदेश देत असल्यामुळे सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.