Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 17:12 IST2025-10-04T17:06:27+5:302025-10-04T17:12:26+5:30

Kojagiri Purnima 2025: कोजागरी पौर्णिमेला(Kojagiri Purnima 2025) हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. सोळा कलांनी फुललेला चंद्र आणि माता लक्ष्मीचा पृथ्वीवर वावर यामुळे ही तिथी महत्त्वाची मानली जाते. त्यादिवशी जुळून आलेल्या शुभ योगामुळे ८ राशींना धनलाभाची तसेच आर्थिक सुबत्ता लाभण्याचे चिन्ह आहे, असे भाकीत ज्योतिषी चंद्रशेखर क्षीरसागर यांनी वर्तवले आहे.

६ ऑक्टोबर २०२५, सोमवार रोजी कोजागरी पौर्णिमा आहे. या दिवशी चंद्र आणि लक्ष्मीच्या कृपेमुळे विशेष शुभ योग जुळून येत आहेत. पौर्णिमेमुळे चंद्र तेजस्वी दिसेल, ज्याच्या दर्शनाने मनःशांती लाभेल. सोमवार हा महादेवाला आणि चंद्राला समर्पित असल्याने महादेव, चंद्र आणि देवी लक्ष्मीची उपासना अधिक फलदायी ठरेल, कारण कोजागरी पौर्णिमेची रात्र लक्ष्मीची उपासना आणि धनवृद्धीसाठी सर्वात पवित्र मानली जाते. याचा लाभ कोणत्या राशींना मिळणार ते पाहू.

१. मेष (Aries) : लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. चंद्रामुळे मन शांत राहील, पण महत्त्वाचे निर्णय घाईत घेणे टाळावे. कार्यक्षेत्रात मोठे निर्णय घेण्यासाठी हा दिवस शुभ आहे, तसेच जीवनसाथीसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. यासाठी कोजागरीच्या रात्री गुलाबजल मिश्रित पाण्याने स्नान करणे लाभदायक ठरेल. या दिवशी लाह्या आणि बत्तासे यांचे गरजूंना दान करा!

२. वृषभ (Taurus) : या दिवशी तुमची आर्थिक बाजू स्थिर राहील आणि गुंतवणुकीचे लाभ मिळतील. तुमच्या बोलण्यातील गोडवा संबंधांमध्ये समृद्धी आणेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक शांतता मिळेल. याशिवाय कला आणि साहित्याच्या क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होतील. म्हणून, पौर्णिमेच्या चंद्राला खीर अर्पण करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील.या दिवशी दूध किंवा मिठाई यांचे गरजूंना दान करा!

३. मिथुन (Gemini) : हा दिवस तुमच्या अडकलेल्या समस्या मार्गी लावेल आणि तुम्हाला यश मिळेल. तुमच्या मित्रांचे आणि भावंडांचे सहकार्य लाभेल आणि बुद्धिमत्तेच्या बळावर करिअरमध्ये प्रगती कराल. जास्त विचार करणे टाळा आणि वर्तमानात जगा. यासोबतच, विष्णू सहस्त्रनाम पठण केल्यास शुभ फळ मिळेल. या दिवशी कोणत्याही पांढऱ्या वास्तूचे गरजूंना दान करा!

४. कर्क (Cancer) : लक्ष्मीच्या कृपेमुळे तुमच्या घरात पैशांची आवक वाढू शकते, पण कौटुंबिक बाबींवर जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. मनःशांती अनुभवल्यामुळे तुमची कार्यक्षमता सुधारेल आणि जुन्या समस्यांना निरोप देण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. घरात दूधाचे पदार्थ बनवून देवीला अर्पण केल्यास तुमच्या कुटुंबात शांती लाभेल. या दिवशी शैक्षणिक किंवा आर्थिक स्वरूपात गरजूंना दान करा!

५. सिंह (Leo) : या दिवशी तुमचे नेतृत्व गुण प्रभावी ठरतील, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात तुमची प्रतिष्ठा वाढेल. अहंकारावर नियंत्रण ठेवल्यास संबंधात गोडवा टिकून राहील आणि गुंतवणुकीवर विचार करून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. यासाठी, या दिवशी सूर्य आणि चंद्राची उपासना करणे भाग्यासाठी शुभ ठरेल. या दिवशी कपडे, शाल, पांघरूण यांचे गरजूंना दान करा!

६. कन्या (Virgo) : परदेशाशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत छोटीशी काळजी घेणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च आणि वाद पूर्णपणे टाळा. कोजागरीच्या रात्री गायत्री मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. या दिवशी लाह्या आणि बत्तासे यांचे गरजूंना दान करा!

७. तूळ (Libra) : या एकादशीमुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. नवीन व्यवसाय भागीदारी करण्यासाठी काळ चांगला आहे आणि विवाहित जीवनात आनंद आणि समन्वय वाढेल. कोणतेही काम एकट्याने करण्याऐवजी सामूहिक प्रयत्न करा. चंद्रप्रकाशात बसून ध्यान केल्यास तुम्हाला मनःशांती मिळेल. या दिवशी कच्चे धान्य, तेल, मीठ यांचे गरजूंना दान करा!

८. वृश्चिक (Scorpio) : कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठे यश आणि वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. तुमच्या आर्थिक कर्जातून सुटका होण्याची शक्यता आहे आणि गुंतलेले धन परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणे योग्य ठरेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास वाद टळतील. देवी लक्ष्मीला लाल फुले अर्पण करणे तुमच्यासाठी विशेष शुभदायक ठरेल. या दिवशी आर्थिक स्वरूपात यथाशक्ती गरजूंना दान करा!

९. धनू (Sagittarius) : भाग्याची साथ मिळाल्याने तुमची सर्व कामे पूर्ण होतील आणि यश मिळेल. उच्च शिक्षण आणि धार्मिक प्रवासासाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या तत्त्वज्ञानाचा कामाच्या ठिकाणी मोठा प्रभाव पडेल. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करणे तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरू शकते. या दिवशी एकवेळचे जेवण गरजूंना दान करा!

१०. मकर (Capricorn) : कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांना यश मिळेल. तुम्हाला पदोन्नती किंवा वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे. वडिलांच्या आरोग्याची आणि त्यांच्या मताची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जमीन-जुमला किंवा मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. या दिवशी विष्णूची उपासना केल्यास तुमच्या जीवनात स्थिरता प्राप्त होईल. या दिवशी दूध किंवा मिठाईचे गरजूंना दान करा!

११. कुंभ (Aquarius) : सामाजिक आणि धार्मिक कार्यात तुमचा सक्रिय सहभाग राहील. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने अडलेली कामे पूर्ण होतील. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगले यश मिळेल. अनावश्यक खर्च मात्र टाळा आणि बजेटचे पालन करा. या दिवशी हसण्याची आणि आनंदी वृत्ती ठेवल्यास अनेक अडचणी दूर होतील. या दिवशी फुटाणे आणि गूळ यांचे गरजूंना दान करा!

१२. मीन (Pisces) : या पौर्णिमेमुळे आर्थिक गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे मन भावनिक राहील, पण तरीही तुम्ही योग्य निर्णय घ्याल. आरोग्याच्या दृष्टीने निष्काळजीपणा करणे टाळावे. अध्यात्मिक विषयांमध्ये रुची वाढेल आणि भगवान विष्णूच्या उपासनेमुळे तुम्हाला संकटांवर विजय मिळवाल. या दिवशी लाह्या आणि बत्तासे यांचे गरजूंना दान करा!