आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 07:44 IST2026-01-09T07:44:16+5:302026-01-09T07:44:42+5:30

Iran Protests 2026: इराणमध्ये खामेनेई शासनाविरुद्ध मोठे जनआंदोलन सुरू झाले आहे. रेझा पहलवी यांच्या समर्थनार्थ आंदोलक रस्त्यावर उतरले असून इराणने एअरस्पेस बंद केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. वाचा सविस्तर बातमी.

Iran Protests 2026 Protesters occupy Iran's capital! Government offices occupied in the dark of night, Tehran closes airspace... | आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...

आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...

तेहरान: इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ताविरोधी आंदोलनाने आता रौद्र रूप धारण केले आहे. राजधानी तेहरानसह संपूर्ण देश सध्या धगधगत असून, आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये रात्रभर भीषण चकमकी झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, खामेनेई शासनाने संपूर्ण देशाची हवाई हद्द बंद केली असून तेहरानचा मुख्य विमानतळही ठप्प करण्यात आला आहे.

इराणचे माजी राजा यांचे पुत्र रेझा पहलवी यांनी केलेल्या आवाहनानंतर हे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. आंदोलक रस्त्यावर उतरून "ही शेवटची लढाई आहे, पहलवी परतणार" आणि "शाह चिरायू होवोत" अशा घोषणा देत आहेत. जनतेचा हा वाढता आक्रोश पाहून सरकार प्रचंड दबावाखाली आहे. आंदोलकांनी तेहरान ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे, सरकारी कार्यालये फोडली जात आहेत. तेहरानचे मुख्य रस्ते बंद करण्यात आले असून अमेरिका हल्ला करण्याची शक्यता वाढली आहे. 

खामेनेई शासन घाबरले?
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून इराण सरकारने सुरक्षेचे अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. देशातील एअर डिफेन्स सिस्टम सक्रिय करण्यात आली आहे. इंटरनेटवर बंदी घालण्यात आली असून, कोणत्याही प्रकारच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा दलांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. जाणकारांच्या मते, गेल्या अनेक वर्षांतील हे इराणमधील सर्वात मोठे संकट आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
इराणमधील या हिंसक वळणावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी इराणला धमकी देताना म्हटले की, "जर इराणमध्ये शांततापूर्ण आंदोलकांची हत्या करण्यात आली, तर अमेरिका गप्प बसणार नाही आणि याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल." दुसरीकडे, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनीही आंदोलकांना पाठिंबा दर्शवला आहे. वेंस म्हणाले, "अमेरिका हक्कासाठी लढणाऱ्या लोकांच्या सोबत आहे. इराणने आपल्या अणू कार्यक्रमाबाबत अमेरिकेशी वास्तविक चर्चा करणेच त्यांच्या हिताचे ठरेल."

Web Title : आंदोलनकारियों का ईरानी राजधानी पर कब्जा; अशांति के बीच तेहरान ने हवाई क्षेत्र बंद किया

Web Summary : ईरान में सरकार विरोधी प्रदर्शन तेज, तेहरान में झड़पें। सरकार ने हवाई क्षेत्र और मुख्य हवाई अड्डा बंद किया। प्रदर्शनकारी पूर्व शाह के वंश की वापसी की मांग कर रहे हैं। अमेरिका ने हिंसा के खिलाफ चेतावनी दी, प्रदर्शनकारियों के अधिकारों का समर्थन किया।

Web Title : Protesters Seize Iranian Capital; Tehran Shuts Down Airspace Amid Unrest

Web Summary : Anti-government protests intensify in Iran, with clashes in Tehran. The government closed airspace and the main airport. Protesters demand the return of the former Shah's dynasty. The US warns against violence, supporting the protestors' rights.