Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 10:32 IST2026-04-22T10:31:07+5:302026-04-22T10:32:12+5:30

Leopard Attack 8-year-old boy: कसारा जवळील कळभोंडे लाद्याची वाडी येथील जंगलात रानमेवा गोळा करणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

Leopard Attack: 8-year-old boy dies in leopard attack in Kasara-Kalbhonde | Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
कसारा: कसारा जवळील कळभोंडे लाद्याची वाडी येथील जंगलात रानमेवा गोळा करणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. कृष्णा भागा आगिवले असे मृत मुलाचे नाव आहे. कृष्णा जंगलात झाडावरील आंबे आणि करवंदे गोळा करीत होता. त्याच वेळी जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने कृष्णावर झडप घातली. या झटापटीत बिबट्याने फरपटत नेलेल्या कृष्णाचा मृत्यू झाला.

अनेक दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली होती. मात्र, कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने अखेर एका निष्पाप मुलाचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आईवर जबाबदारी मृत झालेल्या कृष्णाला वडील नाहीत. त्यामुळे घरची जबाबदारी कृष्णाच्या आईवर आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा, यासाठी कृष्णाची आई गुलाबीबाई या आळे फाटा येथे कांदे काढायच्या कामासाठी रोजंदारीवर कामाला गेल्या होत्या. चार तास मृतदेह पडून सकाळी आठ वाजता घटनेची माहिती स्थानिक वनविभागाला दिल्यानंतरही दुपारी १२ पर्यंत वनकर्मचारी घटनास्थळी दखल न झाल्याने मृतदेह उन्हात चार तास पडून होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.

रेस्क्यू पथक दाखल

शहापूर : बिबट्याचा शोध घेण्यासाठी विशेष रेस्क्यू पथक दाखल झाल्याची माहिती शहापूरचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा यांनी दिली. मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

Web Title : कसारा-कळभोंडे में तेंदुए के हमले में 8 वर्षीय बच्चे की मौत

Web Summary : कसारा के पास फल इकट्ठा कर रहे आठ वर्षीय बच्चे की तेंदुए के हमले में मौत हो गई। ग्रामीणों का आरोप है कि पूर्व चेतावनी के बावजूद वन विभाग की प्रतिक्रिया में देरी हुई। राज्य सरकार ने पीड़ित परिवार के लिए ₹25 लाख की आर्थिक सहायता की घोषणा की। बचाव दल तैनात।

Web Title : Leopard Kills 8-Year-Old Boy in Kasara-Kalbhonde Area

Web Summary : An eight-year-old boy died in a leopard attack near Kasara while collecting fruits. Locals allege delayed response from forest officials despite prior warnings. The state government announced financial aid of ₹25 lakh for the grieving family. Rescue team deployed.