"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं

By संतोष कनमुसे | Updated: April 22, 2026 10:39 IST2026-04-22T10:25:30+5:302026-04-22T10:39:50+5:30

या कोंडीत अडकून पडलेल्या एका उच्चभ्रू मुंबईकर महिलेचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्या महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आगपाखड केली. यामुळे गोंधळ उडाला होता.

"A woman who is stronger than thousands!" Rohit Pawar praises that warrior; slams the government for the police action | "हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं

"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं

संसदेत महिला आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक फेटाळल्याने संतप्त झालेल्या सत्ताधारी भाजपने काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात वरळीत महिलांच्या भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी झाली होती. यामुळे वाहतुकी कोंडी झाली होती. यामुळे या कोंडीत अडकून पडलेल्या एका उच्चभ्रू मुंबईकर महिलेचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्या महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आगपाखड केली. यामुळे गोंधळ उडाला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्या महिलेचे बाजू घेत भाजपाला इशारा दिला आहे. 

मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले

वरळीतील त्या महिलेची बाजू घेऊन आता आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. "नौटंकी करणाऱ्या भाजपाला एकट्या महिलेने भर रस्त्यात उघडं पाडलं," अशा शब्दांत रोहित पवारांनी भाजपवर टीका केली.

रोहित पवार यांनी ट्विट करत या महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, "नौटंकी करणाऱ्या भाजपाला एकट्या महिलेने भर रस्त्यात उघडं करुन खऱ्या अर्थाने ‘हजारोंसे भारी… एक नारी’ हे सिद्ध केले आहे. ही नारी शक्ती खऱ्या अर्थाने वंदनीय आहे." त्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरोधकांनी याला 'नारी शक्तीचा विजय' म्हटले आहे.

पोलिसी कारवाईवरून दिला इशारा

फक्त कौतुकच नाही, तर रोहित पवारांनी सरकारला सावधही केले आहे. "आता त्या भगिनीला पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो," अशी भीती व्यक्त करत त्यांनी इशारा दिला की, "जर तसं झालं तर सत्यासाठी भिडणाऱ्या अशा शेकडो 'नारी शक्ती' पुढे येऊन भाजपचा मुखवटा पुन्हा टराटरा फाडतील."

Web Title : महिला के गुस्से ने बीजेपी का 'नाटक' उजागर किया, रोहित पवार ने की प्रशंसा

Web Summary : बीजेपी के विरोध प्रदर्शन के कारण लगे ट्रैफिक जाम के खिलाफ एक महिला का गुस्सा वायरल हो गया। रोहित पवार ने उनके साहस की सराहना करते हुए कहा कि उन्होंने बीजेपी के 'नाटक' को उजागर किया और पुलिस उत्पीड़न के खिलाफ चेतावनी दी, और आगे प्रतिरोध का वादा किया।

Web Title : Woman's Fury Exposes BJP's 'Drama,' Praised by Rohit Pawar

Web Summary : A woman's outburst against a BJP protest's traffic jam went viral. Rohit Pawar lauded her courage, saying she exposed the BJP's 'drama' and warned against police harassment, promising further resistance.