जुलै महिन्यात ५ ग्रहांचे परिवर्तन: ‘या’ ५ राशींना उत्तम काळ, ५ राशींसाठी संमिश्र; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 03:33 PM2022-06-25T15:33:27+5:302022-06-25T15:40:21+5:30

जुलै महिन्यात नवग्रहातील दोन अत्यंत महत्त्वाचे ग्रह वक्री होतील. याचा सर्व राशींवर प्रभाव पडेल, असे सांगितले जाते. पाहा, डिटेल्स...

जून महिन्यासह जुलै महिनाही ज्योतिषीय, धार्मिक, सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे. जुलै महिन्यात नवग्रहांपैकी ५ ग्रह स्थानबदल करणार आहेत. याचा मोठा परिणाम देश-दुनियेसह सर्व राशींवर होणार असल्याचे सांगितले जात आहे. (5 planets change position in july month 2022)

जुलै महिन्यात गुरु पौर्णिमा, आषाढी म्हणजेच देवशयनी एकादशी चातुर्मासारंभ यांसारखे अनेकविध सण-उत्सव, व्रत-वैकल्ये साजरी केली जाणार आहे. (5 graha gochar in july 2022)

जुलै महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच २ जुलै रोजी ग्रहांचा राजकुमार बुध मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर, १२ जुलै रोजी शनि स्वराशीत म्हणजे मकर राशीत वक्री मार्गाने प्रवेश करणार आहे. (july month 2022 astrology)

शनी वक्री झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १३ जुलैला शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल, जिथे तो सूर्याची युती होऊ शकेल. तथापि, ही योग काही दिवसांसाठीच असेल कारण १६ जुलै रोजी सूर्य मिथुन राशीतून कर्क राशीत जाईल.

यानंतर, महिन्याच्या शेवटी मीन राशीत गुरु वक्री होणार आहे. मोठ्या ग्रहांच्या राशी बदलाचा प्रभाव फक्त राशींवरच नाही तर देश, जग आणि अर्थव्यवस्थेवरही पडतो, असे म्हटले जाते. तारीख, वेळ आणि ग्रहांच्या बदलाचापरिणाम जाणून घेऊया...

जुलै महिन्याच्या सुरुवातीला २ जुलै रोजी बुध वृषभ राशीतून मिथुन राशीत जाईल. बुध स्वराशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या राशीतील बदल महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच बुध जुलैमध्ये तीनदा राशी बदलेल. प्रथम, २ जुलै रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल, १६ जुलै रोजी कर्क राशीत आणि लगेच ३१ जुलै रोजी सिंह राशीत प्रवेश करेल.

जुलै महिन्यात नवग्रहांचा न्यायाधीश मानलेला शनी आपल्याच कुंभ राशीतून आपले दुसरे स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करे. यानंतर २३ ऑक्टोबरला शनी मकर राशीत मार्गी होईल. आपल्या राशीमध्ये शनी वक्रीचा जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर, राशींवर आणि देश आणि जगावर चांगला प्रभाव पडेल, असे सांगितले जात आहे.

१३ जुलै रोजी शुक्र वृषभ राशीतून बुधाचे स्वामित्व असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करेल. मिथुन राशीत सूर्य आणि बुध विराजमान असल्याने या राशीत त्रिग्रही योग तयार होईल. पण काही दिवसांनी सूर्य राशी बदलेल. शुक्र आणि बुध यांची युती पुढील काही दिवसांसाठी मिथुन राशीत राहील. शुक्र २३ दिवस मिथुन राशीत विराजमान असेल.

नवग्रहांचा राजा सूर्य १६ जुलै रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. सूर्य १७ ऑगस्टपर्यंत या राशीत राहील, त्यानंतर तो आपलेच स्वामित्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश करेल. जेव्हा सूर्य आपली राशी बदलतो तेव्हा ते संक्रमण संक्रांती म्हणून ओळखले जाते. अशाप्रकारे १६ जुलैपासून कर्क संक्रांती सुरू होईल.

जुलै महिन्याच्या शेवटी म्हणजेच २८ जुलै रोजी गुरू मीन राशीमध्ये वक्री होईल. २४ नोव्हेंबर रोजी मार्गी होईल. गुरूची गती बदलल्याने देश आणि जगावर मोठा परिणाम होईल, असे सांगितले जात आहे.

जुलैमध्ये ५ मोठे ग्रह बदलणार आहेत. काही ग्रह स्वतःच्या राशीत येत आहेत तर काही वक्री होत आहेत. सर्व १२ राशींवर याचा परिणाम होणार आहे. मेष, मिथुन, सिंह, मकर, कुंभ राशीसाठी जुलै महिना खूप खास असणार आहे.

दुसरीकडे, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. वृषभ, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी जुलै महिना मध्यम फलदायी राहू शकेल.