EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 03:21 PM2024-06-16T15:21:20+5:302024-06-16T15:25:25+5:30

Ravindra Waikar News : खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाने मतमोजणीदरम्यान मोबाईलचा वापर केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai North West Lok Sabha Impossible to connect any other electronic device to the EVM BJP reply to Congress | EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."

EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."

Mumbai North West Lok Sabha Result : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात लागलेल्या निकालावरुन सध्या मोठा गोंधळ उडाला आहे.  या मतदारसंघातील मतमोजणी आता वादात सापडली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी अमोल कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव केला. एकीकडे मतमोजणीत गैरप्रकार झाल्याची तक्रार अमोल कीर्तिकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. दुसरीकडे खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. वायकरांच्या नातेवाइकाने मतमोजणीदरम्यान ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. यावरुन काँग्रेसने निवडणूक आयोगाला सवाल केला होता. मात्र आता भाजपने काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

वनराई पोलिसांनी रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगेश पंडीलकर हे मतमोजणीच्या खोलीत मोबाईल वापरत असल्याची तक्रार इतर उमेदवारांनी केले होते. त्यानंतर पोलिसांनी ४ जून रोजीच पोलिसांनी हा मोबाईल जप्त केला होता. त्यानंतर आता पोलीस तपासात पंडीलकर हे ईव्हीएमशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. नेस्को सेंटरमध्ये वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी तयार करण्यासाठी हा मोबाईल वापरला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या सगळ्या प्रकारावरुन काँग्रेसने निवडणूक आयोगाला सवाल केला होता. "मुंबईत एनडीएचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन ईव्हीएमशी जोडण्यात आला होता. एनडीएचा हा उमेदवार केवळ ४८ मतांनी विजयी झाला आहे.अशा परिस्थितीत प्रश्न आहेत. एनडीए उमेदवाराच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन ईव्हीएमशी का जोडला गेला? मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी मोबाईल फोन कसा पोहोचला? शंका निर्माण करणारे अनेक प्रश्न आहेत. निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे," असं काँग्रेसने म्हटलं आहे.

त्यावरुन आता भाजपने काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे. खोटं बोला पण रेटून बोला अशी गत विरोधकांची झाली आहे, अशी टीका भाजपने केली आहे.
"ईव्हीएमबद्दल रडीचा डाव काँग्रेसने पुन्हा खेळायला सुरू केला आहे. काही शब्दांची फेरफार आणि माध्यमातील काही HMV हाताशी धरून पुन्हा एकदा ही लबाड लांडग्याची टोळी महाराष्ट्राच्या जनतेला फसवण्यासाठी तयार झाली आहे. ईव्हीएमला अन्य कोणतेही इलेक्ट्रोनिक किंवा इतर उपकरण जोडणे अशक्य आहे म्हणून त्यात मोबाईलद्वारे गडबड झाली हे म्हणणे विरोधकांची भ्रमित मानसिकता दर्शविणारे आहे. काँग्रेसचे आणि त्यांच्या मित्र पक्षांचे जेवढे उमेदवार निवडणूक आले ते देखील याचं ईव्हीएमने निवडून आले मग ते योग्य आणि हे अयोग्य कसे? देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आणि निवडणूक आयोगाने देखील अनेक वेळा ईव्हीएमबाबत सविस्तर माहिती दिली आहे मात्र जनतेला खोटं सांगून त्यांची दिशाभूल करण्याची विरोधकांची खोड जात नाही. जनतेने पुन्हा एकदा नाकारले हे लक्षात येताच विरोधकांनी ईव्हीएमबद्दल अपप्रचार सुरू केला आहे," असे भाजपने म्हटलं आहे.

Web Title: Mumbai North West Lok Sabha Impossible to connect any other electronic device to the EVM BJP reply to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.