TATA Motors धमाका करण्याच्या तयारीत, येत्या वर्षात लाँच होणार 'या' जबरदस्त कार्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 09:06 AM2022-10-03T09:06:26+5:302022-10-03T09:14:06+5:30

टाटा मोटर्स कार (Tata Motors) ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. कंपनीच्या कार्सची विक्री पाहून याचा अंदाज नक्कीच येतो. दरम्यान, कंपनीने आता पुढील वर्षासाठी आपली कंबर कसली आहे.

टाटा मोटर्स कार (Tata Motors) ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. कंपनीच्या कार्सची विक्री पाहून याचा अंदाज नक्कीच येतो. दरम्यान, कंपनीने आता पुढील वर्षासाठी आपली कंबर कसली आहे. 2023 मध्ये, कंपनी आपल्या ग्राहकांना बरेच पर्याय देण्याच्या तयारीत आहे. या अंतर्गत, काही कार्सचे अपडेटेड मॉडेल सादर केले जातील. त्यानंतर काही व्हेरिअंट्सचे इलेक्ट्रीक मॉडेल (Electric Model) येण्याची शक्यता आहे.

ग्लोब न्यूज इनसाइडरच्या अहवालानुसार, 2023 मध्ये टाटा मोटर्स त्याच्या मिडसाइज एसयूव्ही हॅरियरचे अपडेटेड मॉडेल सादर करू शकतात. त्यानंतर अशी चर्चा आहे की कंपनीची 7 सीटर एसयूव्ही सफारीच्या (Safari) एक्सटेंडेड व्हेरिअंट लाँच करण्याच्या तयारीत आहे.

हॅरियर आणि सफारीच्या (Harrier And Safari) अपडेटेड मॉडेल्ससह, टाटा मोटर्स पुढच्या वर्षी इलेक्ट्रीक कार सेगमेंटमध्येही मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 2023 मध्ये टाटा पंच ईव्ही (Tata Punch EV) आणि अल्ट्रोज ईव्ही (Tata Altroz ​​EV) सादर करण्याची शक्यता आहे. अशी अपेक्षा आहे की प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोजचे नवीन मॉडेल झिपट्रॉन इलेक्ट्रीक तंत्रज्ञानासह येऊ शकते.

या व्यतिरिक्त, मिनी एसयूव्ही पंचचं इलेक्ट्रीक व्हेरिअंट नवीन आणि उत्कृष्ट फीचर्ससह सुसज्ज असेल. मीडिया अहवालानुसार, कंपनी त्याच्या ईव्ही मॉडेलमध्ये 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक देऊ शकते. जे 129bhp ची पॉवर देण्यास सक्षम असेल. नवीन मॉडेलमध्ये 300 कि.मी. पेक्षा जास्त रेंज मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

या कार्सव्यतिरिक्त टाटा मोटर्स 2023 मध्ये ग्राहकांना देत असलेल्या पर्यायांमध्ये टाटा नेक्सॉनचाही समावेश आहे. रिपोर्टनुसार कंपनी आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या नेक्सॉनला कंपनी फिटेड सीएनजी व्हेरिअंटमध्ये आणण्याची शक्यता आहे.

नेक्सॉनमध्ये फॅक्ट्री फिटेड सीएनजी किटसह 1.2 लिटर 3 सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिलं जाण्याची शक्यता आहे. तसंच येतं वर्ष टाटा मोटर्ससाठी उत्तम ठरेल असं म्हटलं जात आहे. तसंच कंपनीकडून ग्राहकांनाही काही उत्तम पर्याय मिळण्याची शक्यता आहे.

आम्ही इलेक्ट्रीक वाहनांमध्ये फोअर व्हिलर ड्राईव्ह तंत्रज्ञान देण्यावर लक्ष केंद्रित करू. यावर आम्ही काम करत आहोत, अशी प्रतीक्रिया टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक (पॅसेंजर्स व्हेईकल अँड इलेक्ट्रीक व्हेईकल) शैलेश चंद्र यांनी दिली. 2023 मध्ये लाँच होणाऱ्या कार्समध्ये केवळ विद्यमानच नाही, तर नव्या कार्सचाही समावेश होणार आहे.