Simple One: लाँच झाली देशातील सर्वाधिक रेंज असलेली Electric Scooter; पाहा किंमत आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 07:04 PM2021-08-15T19:04:41+5:302021-08-15T19:09:58+5:30

Simple One: सिंगल चार्जमध्ये मिळते सर्वाधिक 236kms ची रेंज. पाहा आणखी काय आहे या स्कूटरमध्ये विशेष.

Simple One: देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून दोन कंपन्यांनी आपल्या मोस्ट अवेटेड इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केल्या. Ola आणि Simple One या दोन कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत आपल्या स्कूटर सादर केल्या आहेत.

सिंपल एनर्जीनं देशातील सर्वाधिक रेंज देणारी इलेक्ट्रीक स्कूटर Simple One भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. कंपनीनं या इलेक्ट्रीक स्कूटरला स्पोर्टी आणि स्टायलिस्ट डिझाईन देण्यसोबतच पॉवरफुल बॅटरी पॅक आणि मोटरचा वापर केला आहे.

या स्कूटरमध्ये 4.8 KWh क्षमतेच्या बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. तसंच या स्कूटरची मोटर 4.5 KW क्षमतेची पॉवर जनरेट करते. तसंच ही स्कूटर 2.95 सेकंदात 0 पासून 40 किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते असा दावा कंपनीनं केला आहे. या स्कूटरचा सर्वाधिक वेग 105 किमी प्रति तास इतका आहे.

110 किमी वजन असलेल्या या स्कूटरमध्ये 30 लिटरची बुट स्पेस (अंडरसीट स्टोरेज) देण्यात आलं आहे. यामध्ये तुम्ही एक मोठं हेल्मेटही ठेवू शकता.

सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 236 किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते असा दावा कंपनीनं केला आहे. या प्रकरणी ही स्कूटर ओलाच्या इलेक्ट्रीक स्कूटरला मागे सोडते. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 181 किमी इतकी आहे.

Simple One इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीनं टचस्क्रीन डिस्प्ले स्मार्ट डॅशबोर्ड दिला आहे. या स्कूटरला तुम्ही अॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनही कनेक्ट करू शकता. यामध्ये रिमोट अॅक्सेस, सिक्युरिटी अॅपसाठी जिओ फेन्सिंग, OTA अपडेट्स, रूट सेव्ह करण्याची सुविधा, रायडिंग स्टॅटिक्स आणि रिमोट लॉकिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहे.

कंपनीनं ही स्कूटर चार रंगांत बाजारात आणली आहे. यामध्ये Brazen Black, Azure White, Brazen White आणि Namma Red हे कलर ऑप्शन देण्यात आले आहेत.

अतिशय आकर्षक लूक आणि जबरदस्त इलेक्ट्रीक मोटर असलेल्या या स्कूटरची सुरूवातीची किंमत 1,09,999 रूपये एक्स शोरूम इतकी निश्चित करण्यात आली आहे.

कंपनीनं या स्कूटरचं बुकींग आधीपासूनच सुरू केलं आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून या स्कूटरचं बुकींग करता येऊ शकतं. यासाठी केवळ 1947 रूपयांची बुकींग अमाऊंट द्यावी लागणार आहे.

Simple One इलेक्ट्रिक स्कूटरच्या तुलनेत ओलाच्या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. तसंच या त्या स्कूटरची किंमत तुलनेनं कमीही ठेवण्यात आली आहे.