शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या तडाख्यात परभणीत आगीचे सत्र; गोडाऊनमधील साहित्य जळाले, टँकरनेही घेतला पेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 18:07 IST

अग्निशमन दलाने ६ तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या आगींवर मिळवले नियंत्रण

परभणी: परभणी शहरात शनिवारी आगीच्या दोन भीषण घटना घडल्या असून यामुळे प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. पहिली घटना शहरातील अपणा कॉर्नर भागातील मरकज मस्जिद जवळ घडली, तर दुसरी घटना जिंतूर रोडवरील दत्तनगर परिसरात समोर आली आहे.

गोडाऊनला आग अन् धुराचे लोटअपणा कॉर्नर भागातील एका बंद गोडाऊनला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते, ज्यामुळे काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. उपमहापौर गणेश देशमुख यांनी तातडीने अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. अग्निशमन अधिकारी दीपक कानोडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र या आगीत गोडाऊनमधील विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाले आहे.

बंद टँकरचा भडकादुसरी घटना सायंकाळी ४ वाजता जिंतूर रोडवरील दत्तनगर भागात घडली. येथे बंद स्थितीत असलेल्या डांबर वाहतूक करणाऱ्या टँकरने (क्र. MH 22 AA 7569) अचानक पेट घेतला. मदन जाधव आणि इनायत अली यांच्यासह अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Firestorm: Godown Gutted, Tar Tanker Ablaze Amidst Heatwave

Web Summary : Two major fire incidents struck Parbhani. A godown near Apna Corner and a stationary tar tanker on Jintur Road caught fire. Firefighters extinguished both blazes, preventing casualties, though the godown suffered significant damage.
टॅग्स :parabhaniपरभणीfireआग