शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

रोडरोमियोंचा त्रास वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:02 IST

शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागासह पाथरी तालुक्यातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी मानवत शहरात येतात. यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. ...

शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागासह पाथरी तालुक्यातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी मानवत शहरात येतात. यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. शाळा महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थिनी बसची वाट बघत बस स्थानक परिसरात बसत असतात. हिच संधी साधत रोडरोमियो मुली ज्या ठिकाणी थांबलेल्या असतात, त्या ठिकाणी चकरा मारणे, दुचाकीवरून विनाकारण हॉर्न वाजवित जाणे, मुलींना पाहून शेरेबाजी करणे असे प्रकार सर्रासपणे करतात. यातील काही जण शहरातून धूमस्टाईलने दुचाकी पळवून दुचाकीचे कर्कश हॉर्न वाजवित विविध आवाज काढतात. यामुळे अनेक छोटे-मोठे आपघात घडल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शाळा, महाविद्यालय, पोलीस प्रशासन, खासगी शिकवणीवाले यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, जेणेकरून रोडरोमियोंवर कारवाई करणे सोपे जाईल. दुसरीकडे पोलीस प्रशानानाही चिडीमार पथक स्थापन करून रोडरोमियोंना चाप बसविण्याची मागणी पालकांतून होत आहे.

वळण रस्त्यावर अल्पवयीन मुले सुसाट

शहरातील वळण रस्त्यावर दोन महाविद्यालये, एक शाळा आणि खासगी कोचिंग क्लासेस आहेत. महाराणा प्रताप चौक ते मलिकार्जुन मंदिरापर्यंत असलेल्या पुलाशेजारी रस्त्यावर विद्यार्थ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. मुली याच रस्त्याने शाळा महाविद्यालयात येत असतात. या रस्त्यावरून अल्पवयीन मुले मोटारसायकल सुसाट पळवितानाचे चित्र आहे. पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेऊन पालकांशी संपर्क करून समज देणे गरजेचे झाले आहे. टवाळखोर मुलांबाबत समोर येऊन तक्रार करायला मुली घाबरतात. त्यामुळे शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात तक्रारपेट्या बसविण्यात याव्यात. या पेट्या नियमित उघडण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

या भागात सीसीटीव्हीची गरज

मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरपालिकेने पुढाकार घेऊन शहरातील मुलींची वर्दळ असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविल्यास अशा घटनाना आळा घालणे सोपे जाईल. शहरातील बस स्थानक, महाराणा प्रताप चौक, आठवडे बाजार रस्ता, गोलाईत नगर रस्ता, पोलीस क्वार्टर रस्ता, पाळोदी रस्ता, केंद्रीय प्राथिक शाळा या परिसरात सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे, तसेच वळण रस्त्यावर असलेल्या शाळा, महाविद्यालय प्रशासनाने प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही बसविल्यास शाळा, महाविद्यालयाच्या बाहेरील टवाळखोरांवर वॉच ठेवणे सोपे जाईल.