शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
3
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
4
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
6
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
7
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
8
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
9
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
10
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
11
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
12
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
13
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
14
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
15
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
16
मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
17
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
18
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
19
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
20
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खळी नदीच्या पुरातून मृतदेह नेण्याची वेळ; गंगाखेडमध्ये निसर्गाची क्रूरता, गाव संपर्क क्षेत्राबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:40 IST

नांदेडहून आणलेला मृतदेह पुरातून न्यायची वेळ; चिंचटाकळीतील नागरिकांच्या डोळ्यात पाणी

- प्रमोद साळवे 
गंगाखेड (परभणी):
तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांवर अतिवृष्टी आणि बॅकवॉटरमुळे मोठे संकट कोसळले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यातच सोमवारी (दि. २९) चिंचटाकळी येथील नागरिक अच्युत मोरे (वय ४५) यांचे नांदेड येथे उपचारादरम्यान निधन झाल्याने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी गावात आणण्याचा प्रसंग अत्यंत हृदयद्रावक ठरला. मृतदेह गावात नेताना खळी नदी पुलावर नातेवाईक आणि कुटुंबीयांना चक्क तराफ्याचा आधार घेऊन पूर ओलांडावा लागला, ज्यामुळे उपस्थित सर्वांना गहिवरून आले.

आई पोहत गेली, आता मृतदेह तराफ्यावर
मागील दोन दिवसांत गंगाखेड तालुक्यात पुरामुळे जनजीवनाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी खळी येथे एक माता आपल्या लेकरांना भेटण्यासाठी याच नदीच्या पुरातून पोहत पलीकडे पोहोचल्याची घटना ताजी असतानाच, आज (सोमवारी) मृतदेह गावात नेण्यासाठी याच पुराचा सामना करावा लागला. मृतदेह घेऊन आलेल्या नातेवाईक व कुटुंबीयांना खळी नदीवरील पुलावर पाणी असल्याने नाइलाजाने तराफ्याचा आधार घ्यावा लागला. गावातील खळीकरांनी तातडीने मदत करत या भावनिक प्रसंगात मोरे कुटुंबाला मोठा आधार दिला.

पुलाची उंची वाढवण्याचा मुद्दा ऐरणीवर
खळी येथील नदीच्या पुलाची उंची वाढवावी, अशी खळीकरांसह गौडगाव, चिंचटाकळी, पुनर्वसित खळी या गावकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, हा प्रस्ताव शासन-प्रशासन दरबारी लालफीतीत अडकून पडला आहे. परिणामी, रविवार आणि सोमवारसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगांना गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून सामोरे जावे लागत आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे पिके आणि नागरिकांना फटका बसला असताना, दुसरीकडे मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मृतदेह गावात नेणेही अत्यंत आव्हानात्मक झाले आहे. या हृदयद्रावक प्रसंगाने प्रशासकीय दुर्लक्ष आणि निसर्गाची क्रूरता पुन्हा एकदा उघड झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : GangaKhed: Flood forces family to carry body on raft.

Web Summary : In Gangkhed, floods forced a family to transport a deceased relative's body on a raft across the flooded Khali River. The bridge's low height exacerbated the crisis, highlighting infrastructure neglect amid ongoing flood devastation and pleas for a higher bridge.
टॅग्स :Rainपाऊसfloodपूरparabhaniपरभणी