पेडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सुहास भैया इलेव्हन संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST2021-02-24T04:19:17+5:302021-02-24T04:19:17+5:30

पेडगाव येथे गेल्या काही दिवसांपासून इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर पेडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत एकूण ...

Suhas Bhaiya XI wins Pedgaon Premier League Cricket Tournament | पेडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सुहास भैया इलेव्हन संघ विजयी

पेडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सुहास भैया इलेव्हन संघ विजयी

पेडगाव येथे गेल्या काही दिवसांपासून इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर पेडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाने एकूण ९ सामने खेळले व त्यातून गुणाप्रमाणे चार संघाना उपांत्यफेरीमध्ये प्रवेश मिळाला. या स्पर्धेंतर्गत मंगळवारी सुहास भैया इलेव्हन संघ व एसबी इलेव्हन संघ यांच्यात अंतिम सामना झाला. टॉस जिंकून सुहास भैया इलेव्हन संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी एसबी इलेव्हन संघाने १० षटकांमध्ये ६६ धावा काढल्या. विजयासाठी ६७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या सुहास भैया इलेव्हन संघाने ११ चेंडू व ७ खेळाडू राखून विजय मिळवला. विजेत्या संघाला ३१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उपविजेत्या एसबी इलेव्हन संघाला २१ हजार रुपये व चषक प्रदान करण्यात आला. यावेळी सुहास देशमुख पेडगावकर, उपसरपंच सय्यद बादल, सुमंत वाघ, सलमान भैया, प्रतापराव देशमुख, आयोजक अच्युत गायकवाड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सुरवसे यांनी केले.

Web Title: Suhas Bhaiya XI wins Pedgaon Premier League Cricket Tournament