शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

वाळूच्या टिप्परने सरपंचांच्या पतीला चिरडले; संतप्त ग्रामस्थांनी टिप्पर पेटवला, संदलापूरात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 19:00 IST

पूर्णा तालुक्यातील संदलापूर येथील घाटावरून वाळू भरून जात होता टिप्पर

परभणी/ कात्नेश्वर : पूर्णा तालुक्यातील संदलापूर येथील वाळू घाटावरून वाळू भरून भरधाव वेगात जाणाऱ्या टिप्परने गावात येताच सरपंच रुक्मीणबाई यांचे पती पंडित मात्रे यांना चिरडल्याची घटना १२ मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी टिप्पर पेटवून दिला.

संदलापूर घाटातून नजीकचेच गाव असलेल्या सुकी येथील टिप्पर क्रमांक एमएच ४३ यू २८५० हा वाळू नेण्यासाठी आला होता. वाळू भरून घेऊन जाताना संदलापूर गावात एका दुकानावरून सामान घेऊन घराकडे पायी निघालेल्या पंडित मात्रे (वय ५५) यांच्या अंगावरून टिप्पर गेला. यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्रे यांची ही अवस्था पाहिल्यानंतर ग्रामस्थांच्या संतापाचा अनावर झाला. त्यांनी या टिप्परला आग लावून टाकली. टिप्पर जागेवरच खाक झाला, तर टिप्परचा चालक योगेश भागवत काळबांडे (वय २२, रा.सुकी) याला बदडून ताब्यात घेतले.

या घटनेनंतर उपविभागीय अधिकारी समाधान पाटील, पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्यासह पोलिस फौजफाटा गावात दाखल झाला. मृतदेह परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रियेसाठी आणण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

वेगाच्या नियंत्रणासाठी मात्रे यांनी दिली होती समज
या गावातून नेहमीच वाळूची वाहतूक ट्रक आणि मोठ्या वाहनाद्वारे होत होती. वाहनांच्या भरधाव वेगामुळे अपघाताची भीती असल्याने पंडितराव मात्रे यांनी चार ते पाच दिवसांपूर्वी गावातून वाळूची वाहने सावकाश जाऊ द्या, या कारणावरून वाळू माफियांना समज दिली होती. मात्र, वेगावर नियंत्रण न राहिल्याने मात्रे यांचाच बळी गेला.

चालकाला ताब्यात देण्यास ग्रामस्थांनी केला विरोध
घटनेनंतर अपघातास कारणीभूत ठरलेल्या टिप्पर चालकास ग्रामस्थांनी ताब्यात घेतले. महिला व पुरुष रस्त्यावर उतरले होते. पोलिस आल्यानंतरही ते त्या चालकास ताब्यात द्यायला तयार नव्हते. या प्रकरणात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त करीत संताप व्यक्त करीत होते. पोलिसांनी त्यांना समजावत शेवटी आरोपी चालकास ताब्यात घेतले. या प्रकारामुळे पोलिसांनी अधिकची कुमक मागविल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले होते. आरोपी हा सुकीच्या उपसरपंचाचा मुलगा असल्याचे सांगण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sand Tipper Crushes Village Leader's Husband; Mob Sets Tipper Ablaze

Web Summary : A sand-laden tipper truck fatally struck a village leader's husband in Sandalapur, sparking outrage. Enraged locals torched the vehicle, leading to police intervention and heightened tensions in the area. The driver has been arrested.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीsandवाळू