शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

'या संकटात मी तुमच्या सोबत'; भरपावसात पालकमंत्री मेघना बोर्डीकर शेतकऱ्यांच्या बांधावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 18:41 IST

भर पावसात, चिखल तुडवत पालकमंत्री बोर्डीकर यांनी धारासूर ग्रामस्थांची भेट घेतली.

- प्रमोद साळवे
गंगाखेड (परभणी) :
प्रचंड मेघगर्जना, तुफानी पाऊस व विजांच्या कडकडाटात सुरू असतानाही अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना भेटीसाठी दिलेला 'पालकत्वा'चा वेळ परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शुक्रवारी (दि.२६) अत्यंत काटेकोरपणे पाळला. तालुक्यातील धारासूर येथे आज दुपारी मंत्री बोर्डीकर यांनी भेट दिली. या नैसर्गिक संकटात पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे, असा धीर त्यांनी अतिवृष्टीग्रस्तांना दिला.

शुक्रवारी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा तालुक्यातील गंगाखेड येथे अतिवृष्टी भागात पूरपरिस्थितीचापूर्वनियोजित प्रशासकीय दौरा होता. नेमका याच कालावधीत धारासूर व परिसरात प्रचंड मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुफानी पावसाला सुरुवात झाली. परंतु जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या मंत्री बोर्डीकर यांनी अशा परिस्थितीतही दुपारी ३:३० वाजता थेट धारासूर गाठले. भर पावसात, चिखल तुडवत पालकमंत्री बोर्डीकर यांनी धारासूर ग्रामस्थांची भेट घेत नैसर्गिक संकटांचा एकत्रितपणे सामना करू असा दिलासा देत मदतीचे ठोस आश्वासन दिले. 

यावेळी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार उषाकिरण शृंगारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) सुरेश भुमरे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, धारासुरचे सरपंच राजेभाऊ गवळी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप कदम यांचेसह निवृत्ती  कदम, दगडू जाधव, अशोक कदम, लक्ष्मण कदम, निवृत्ती कदम, बालासाहेब नेमाने, कृष्णा जाधव, अशोक क्षीरसागर, विश्वनाथ जाधव, प्रदुम शिंदे, दगडू ढेंबरे तसेच तांडा वस्तीतील पुरुष, महिला उपस्थित होत्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Minister Stands with Farmers in Crisis, Visits Rain-Soaked Fields

Web Summary : Amidst heavy rain, Minister Meghna Bordikar visited flood-affected farmers in Dharasur, Parbhani district. She assured them of support and promised concrete assistance, demonstrating her commitment despite the challenging weather conditions and offering solace during the natural calamity.
टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी