परभणी : शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून व विश्वास संपादन करून माजी उपप्राचार्य याने तीन बेरोजगार युवकांची ३९ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. विशेष म्हणजे, यातील दोन जणांना भारतीय रेल्वेचा सही शिक्का असलेले बनावट नियुक्तीपत्र व प्रशिक्षण पत्र देखील दिले होते. याप्रकरणी नानलापेठ पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री संबंधित माजी उपप्राचार्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
कारेगाव रोड गजानन नगर भागातील आकाश उत्तमराव घाळगीर यांनी फिर्याद दिली. पोखर्णी देवी (ता.पालम) येथे आकाश घाडगे हे कुटुंबासह शेतीचा व्यवसाय करतात. बीएससी पर्यंत त्यांचे पदवी शिक्षण झाले आहे. फिर्यादीत नमूद केले की, आकाश घाळगीर यांचे नातेवाईक शंकर हाके (रा.रामकृष्ण नगर) यांच्याकडे येणे जाणे होते. त्यांच्या परिचयाचे इसम आप्पाराव नारायण डहाळे (६०, रा.रामकृष्ण नगर, वसमत रोड) यांच्याशी सन २०२३ मध्ये त्यांचा परिचय झाला होता. त्यावेळी आप्पाराव डहाळे हे शिवाजी महाविद्यालय येथे कार्यरत होते. नोकरीच्या शोधात असताना आप्पाराव डहाळे यांच्याशी फेब्रुवारी २०२३ मध्ये हाके मेडिकल शासकीय रुग्णालयासमोर शंकर हाके यांच्यासमक्ष फिर्यादीची भेट झाली. यावेळी आप्पाराव डहाळे यांनी सरकारी नोकरी लावण्याचा संदर्भाने विचारपूस केली होती. डहाळे यांनी त्यांचे मंत्रालयामध्ये ओळख असून या ओळखीच्या मार्फत मुलांना शासकीय नोकरी मिळवून दिल्याचे सांगितले, शासकीय नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. शासकीय नोकरी लावण्यासाठी त्यांनी १५ लाख रुपयांची मागणी केली व सदर रक्कम ही ते मंत्रालयात देणार असल्याचे सांगितले. आप्पाराव डहाळे हे उपप्राचार्य असल्याने व माझ्या नातेवाईक त्यांच्याशी बऱ्याच दिवसापासून परिचित असल्याने यावर विश्वास बसला. त्यांनी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अथवा इतर विभागात लिपिक म्हणून शासकीय नोकरी लावण्याचे आश्वासन दिले होते.
यानंतर आकाश घाळगीर यांनी पोखर्णी देवी येथील शेतजमीन विक्री करून व काही पैसे सासरे शिवाजी खांडेकर यांच्याकडून घेतले. २३ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी अकरा वाजता हाके मेडिकल येथे शंकरराव हाके यांच्यासमक्ष आप्पाराव डहाळे यांच्याकडे १५ लाख रोख स्वरूपात दिले. त्यानंतर दोन महिन्यात शासकीय नोकरी लावतो म्हणून त्यांनी आश्वासन दिले होते. नोकरी संदर्भाने वारंवार विचारणा केली, आज उद्या असे म्हणून त्यांनी वेळ मारून नेली. यात जवळपास दोन वर्ष कालावधी गेला. आर्थिक फसवणूक झाल्याचे समजल्याने पैसे परत देण्यासाठी विनंती केली. त्यांनी शासकीय नोकरी दिली नाही व पैसेही परत केले नाहीत. आप्पाराव डहाळे हे शिवाजी महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले असता त्यांनी परभणी सोडून कुठेतरी अज्ञात ठिकाणी राहण्यासाठी गेले व फोन घेणे देखील बंद केल्याचे फिर्यादीत नमूद केले.
अन्य दोघांचीही फसवणूकआप्पाराव डहाळे यांनी फिर्यादी यांच्याप्रमाणेच शासकीय नोकरी लावून देतो, असे म्हणून इतर काही लोकांना फसवल्याचे फिर्यादींना समजले. यामध्ये मुरलीधर वाघ, पवन सरगर, कैलास गडदे यांची देखील आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले. यात पवन सरगर यांची १२ लाख व कैलास गडदे यांची १२ लाख घेऊन आर्थिक फसवणूक केली. हे पैसे आप्पाराव डहाळे यांना पवन सरगर व कैलास गडदे यांनी जाम नाका येथील हनुमान मंदिराजवळ हॉटेलमध्ये डिसेंबर २०२४ मध्ये दिले होते. या दोघांना भारतीय रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाचे बनावट नियुक्तीपत्र व प्रशिक्षण पत्र दिले. मात्र, त्यांनाही शासकीय नोकरी लावतो असे सांगून पैसे ही परत दिले नाहीत.
चौकशात ११ जणांची फसवणूकयाप्रकरणी नानलपेठ ठाण्यात बुधवारी रात्री आप्पाराव डहाळे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद झाला. यात पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत जवळपास ११ जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात तीन जणांनी हा गुन्हा नोंद केला. यामध्ये अजूनही काही सुशिक्षित बेरोजगार फसल्याने आकडा वाढण्याची शक्यता आहे. तपास पोलिस निरीक्षक गणेश कदम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर खजे करीत आहेत.
डहाळे परभणी सोडून गायबहा सर्व प्रकार सन २०२३ तसेच २०२४ मध्ये घडला होता. माजी उपप्राचार्य हे २०२४ मध्ये सेवानिवृत्त झाले. यानंतर मे २०२५ मध्ये ते कुटुंबासह परभणी सोडून गायब झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.
Web Summary : An ex-Vice Principal in Parbhani allegedly defrauded three unemployed youths of ₹39 lakhs with job promises. He provided fake railway appointment letters to two. Police have registered a case; investigations reveal 11 victims.
Web Summary : परभणी में एक पूर्व प्राचार्य पर नौकरी का वादा कर तीन बेरोजगार युवाओं से ₹39 लाख ठगने का आरोप है। दो को नकली रेलवे नियुक्ति पत्र दिए। पुलिस ने मामला दर्ज किया; जांच में 11 पीड़ितों का खुलासा।