शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीला जंक्शनचा दर्जा, पण ४५ किमीच्या रेल्वे मार्गाची सुरक्षा चौकीवर! स्वतंत्र पोलीस ठाण्याची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 17:39 IST

४५ किमी रेल्वे मार्गाची सुरक्षा चौकीच्या कारभारावर; परभणी रेल्वे जंक्शनला जीआरपी ठाणे निर्मितीची गरज

- राजन मंगरुळकरपरभणी : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन. दररोज किमान १० हजारांपेक्षा अधिक प्रवाशांची ये-जा या स्थानकावर आहे. दर दिवसाला ४० पेक्षा अधिक एक्सप्रेस रेल्वे विविध राज्यांमध्ये येथून मार्गस्थ होतात. असे असताना प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मात्र अजूनही स्थानक कोसो दूर आहे. जंक्शनसारख्या महत्त्वाच्या स्थानकावर जीआरपी पोलिसांची केवळ एक चौकी कार्यान्वित आहे. चौकीतील अधिकारी, कर्मचारी मिळून सात ते आठ जणांवर ४५ किलोमीटरची रेल्वे लोहमार्गाची भिस्त अवलंबून आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलिस ठाणे निर्मिती कधी होणार ? याची प्रतीक्षा लागली आहे.

नांदेड ते मनमाड रेल्वेमार्गावर नांदेड येथे जीआरपी पोलिस ठाणे आहे. यानंतर परभणी हे महत्त्वाचे जंक्शन असून येथे आरपीएफचे पोलिस ठाणे, तर जीआरपीची मात्र पोलिस चौकी कार्यान्वित आहे. मध्यरात्री लांब पल्ल्याच्या दक्षिण भारत व विविध ठिकाणी धावणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण, वातानुकूलित डबे अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडेकोट असणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांत मानवत, ढेंगळी पिंपळगाव, पेडगाव, देवलगाव अवचार, सिंगणापूर, पोखर्णी, पिंगळी अशा स्थानकाच्या दरम्यान छोट्या-मोठ्या घटनांमध्ये रेल्वेत दरोडा, चोरी झाल्याचे प्रकार घडले आहेत. सिग्नल तोडून तांत्रिक बिघाड करून काही चोरी झाल्याचेही नुकतेच समोर आले आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम बनविण्यासाठी परभणी रेल्वे जंक्शन येथे पोलिस ठाणे निर्मितीसह वाढीव मनुष्यबळाची गरज आहे.

...असे आहे जीआरपीचे कार्यक्षेत्रपरभणी रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलिस दूरक्षेत्र चौकी आहे. येथे एक सहायक पोलिस निरीक्षक, दोन जमादार आणि तीन कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आहे. परभणी स्थानकासह पिंगळी, पेडगाव, देवलगाव अवचार, मानवत स्थानकापर्यंत व गंगाखेड मार्गावर पाच किलोमीटरपर्यंत मिळून जीआरपी चौकीअंतर्गत ४५ किलोमीटर कार्यक्षेत्र आहे.

पुनर्विकासाचे काम सुरू, ठाणे निर्मिती कधी ?अमृत भारत स्टेशनअंतर्गत परभणी रेल्वे जंक्शन, पूर्णा, गंगाखेड, सेलू, परतूर या पाच स्थानकांचे पुनर्विकासाचे काम सुरू आहे. मात्र, परभणी रेल्वे जंक्शन येथे हे काम होत असले तरी स्थानकावरील प्रवाशांची सुरक्षा आणि रात्रीच्या रेल्वेगाड्यांमधील सुरक्षेसाठी जीआरपी पोलिस ठाणे निर्मिती होणार तरी कधी, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

तर होते पोलिस ठाणे निर्मितीदरवर्षीचे वार्षिक गुन्ह्याचे प्रमाण २०० पेक्षा अधिक आणि एखाद्या स्थानकाच्या शहर हद्दीतील लोकसंख्या ही दोन लाखांपेक्षा अधिक असेल तर त्या ठिकाणी रेल्वे पोलिस ठाणे निर्मिती केली जाते. या दोन्हीही निकषांमध्ये परभणी रेल्वेस्थानक बसत असतानाही यंत्रणेकडून प्रस्ताव मंजूर झालेला नाही. एकीकडे रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस ठाणे पाच ते सात वर्षांपूर्वी निर्माण झाले. मात्र, कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या जीआरपीचे ठाणे अद्यापही झालेले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Junction Status, but Railway Security Relies on Outpost, Police Station Awaited

Web Summary : Parbhani railway junction, a key hub, lacks a dedicated police station. Security relies on a small GRP outpost covering 45 km. Despite redevelopment, passengers await enhanced safety measures and a full-fledged police presence to curb rising crime.
टॅग्स :railwayरेल्वेparabhaniपरभणी