शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:16 IST

ग्रामीण भागाची आर्थिक वाहिनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीसाठी महत्त्वपूर्ण बँक मानली जाते. शासनाच्या विविध योजना, ...

ग्रामीण भागाची आर्थिक वाहिनी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीसाठी महत्त्वपूर्ण बँक मानली जाते. शासनाच्या विविध योजना, अनुदान या बँकेच्या माध्यामातूनच शेतकऱ्यांपर्यंत वितरित केले जाते. त्याचप्रमाणे परभणी आणि हिंगोली अशा दोन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असूून या जिल्ह्यांमध्ये बँकेच्या दीडशेपेक्षा अधिक शाखा आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक ताब्यात घेण्यााठी राजकीय क्षेत्रात चुरस निर्माण होते. बँकेच्या निवडणुकीसाठी तयारीही सुरू झाली आहे. पॅनल गठित केले जात असून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापणार आहे.

अनर्हता दिनांकासंदर्भात होते अपील

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम एक वर्ष उशिराने जाहीर झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्याचा अर्हता दिनांक बदलून मिळावा, नवीन संस्था मतदानापासून वंचित राहू नये, अर्हता दिनांक बदलून या संस्थांनाही मतदानाचा अधिकार द्यावा, या आशयाची याचिका न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत ही याचिका फेटाळल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘जिल्हा बँकेच्या संदर्भात दाखल झालेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मात्र त्यासंदर्भातील अधिकृत आदेश प्राप्त झाला नाही. हा आदेश प्राप्त झाल्यानंतर आदेशानुसार पुढील प्रक्रिया होईल’.- मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक