शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांची तब्येत बिघडली; ओपीडीमध्ये दुप्पट वाढ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:22 IST

परभणी : जिल्ह्यात मागच्या पंधरा दिवसांपासून डेंग्यू साथीचा फैलाव झाला असून, जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. पावसाळा ...

परभणी : जिल्ह्यात मागच्या पंधरा दिवसांपासून डेंग्यू साथीचा फैलाव झाला असून, जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे.

पावसाळा सुरू होताच साथीचे आजार वाढतात. यावर्षी डेंग्यू, चिकुनगुनिया यासारख्या साथीचा फैलाव जिल्ह्यात झाला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही ही साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून, येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ताप, खोकल्याने त्रस्त असलेले रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. जिल्हा रुग्णालयात साधारणत: १२०० रुग्णांची ओपीडी आहे. ती आता दुप्पट झाली आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांमध्येही उपचार घेणाऱ्या तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

५० टक्के मुलांची कोरोना चाचणी

तापाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांपैकी ५० टक्के मुलांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

संशयित वाटत असल्यास मुलांची कोरोना चाचणी करून घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.

डेंग्यूच्या २७६ तपासण्या

जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने जुलै अखेरपर्यंत डेंग्यू संशयित रुग्णांच्या २७६ तपासण्या केल्या आहेत, तर मलेरियाच्या २३ हजार ३९२ तपासण्या करण्यात आल्या आहेत. मात्र, या सर्व तपासण्यांमध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही.

सध्या तापाची साथ मोठ्या प्रमाणात आहे. ताप नियंत्रणात आणण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. मनपाने स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवावी, तसेच नागरिकांनीही घरासमोरील नाल्या वाहत्या कराव्यात, तसेच पूर्ण अंग झाकतील असे कपडे वापरावेत. जेणे करून डास चावला तरी त्याची तीव्रता कमी होऊ शकेल. त्याचप्रमाणे पाणी उकळून प्यावे. हवेतून आणि डासांमुळे ही साथ पसरत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होणार नाही, यादृष्टीने प्रत्येकाने काळजी घ्यावी. मुलांना तापाची लक्षणे आढळत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

- डॉ. संदीप कार्ले

ही घ्या काळजी

घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरासमोरील नाल्या वाहत्या कराव्यात. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळून पाण्याचे भांडे रिकामे करावेत. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, तसेच डास निर्मूलनाचे उपाय करावेत.