शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

बस दुरुस्तीसाठी वर्षाला ६ कोटींच्या निधीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST

राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या ४ आगारामध्ये २६६ बसेस आहेत. यातील बहुतांश बसेस ...

राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या ४ आगारामध्ये २६६ बसेस आहेत. यातील बहुतांश बसेस या मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास पूर्ण करावा लागतो. विशेष म्हणजे चार आगारातील बसच्या दुरुस्तीसाठी वर्षाला ६ कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यातच आता मागील वर्षभरापासून वारंवार लॉकडाऊन जाहीर करण्यात येत असल्याने या चारही आगारातील बसेस एका जागेवरच आहेत. त्यामुळे बसच्या नादुरुस्तीमध्ये आणखीनच भर पडली आहे. काही बसेसच्या काचा निखळल्या असून काही बसेसच्या शीट फाटल्या आहेत. त्यामुळे अगोदरच कोरोनामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या एसटी महामंडळ प्रशासनाला बस सुरू करण्यापूर्वी बसेसची दुरुस्ती करण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. त्यामुळे यावर्षी बसेसच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या निधीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे मंगळवारी परभणी येथील आगारात उभ्या असलेल्या बसेसची पाहणी करताना दिसून आले.

वर्षातून केवळ अडीच महिने रस्त्यावर

मार्च २०२०पासून जिल्ह्यामध्ये कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर वारंवार संचारबंदी, लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची सेवा जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार बंद ठेवावी लागते. विशेष म्हणजे वर्षभरातून केवळ अडीच महिन्यात बस रस्त्यावरून धावली आहे. त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासनाला या वर्षभरात मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.

साडेसहा कोटींचा येणार खर्च

परभणी जिल्ह्यातील चार आगारातील 266 बसच्या नियमित दुरुस्तीसाठी सहा कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून काही बसेस एका जागेवरच उभे आहेत. त्यामुळे या बसेस सुरू करण्यासाठी किमान 50 लाख रुपयांचा खर्च वाढणार आहे. परिणामी वर्षाकाठी साडेसहा कोटी रुपयांचा खर्च बस दुरुस्तीसाठी होण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या काळात बस आगारांमध्ये उभ्या जरी असल्या तरी नियमितपणे त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार बसेसची दुरुस्तीसह इतर कामकाज कर्मचाऱ्यांकडून नियमित केले जातात. त्यामुळे एकाच जागेवर वर्षभरापासून उभ्या असलेल्या बसेस नादुरुस्त होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

मुक्तेश्वर जोशी, विभागीय नियंत्रक, परभणी