शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

मै अपनी फेवरिट हूं..या दिवाळीत, डोक्यातली जुनाट जळमटं काढू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 05:00 IST

या दिवाळीत, डोक्यातली जुनाट जळमटं काढू, बदं करू स्वत:चा रागराग करणं, स्वत:वर प्रेम करायला शिकू आणि मग म्हणू, प्यार बांटनेसे बढता है..

Wanting to be someone else is a waste of the person you are..
- मर्लिन मन्रोचं
जगप्रसिद्ध वाक्य आहे..
ती म्हणते,
दुसºया कुणासारखं
तरी होण्याचा प्रयत्न करणं
म्हणजे आपण स्वत:ला
वाया घालवण्यासारखं आहे..
असं वाया घालवतो का
आपण स्वत:ला?
- नाही म्हणतो आपण.
पण ते खोटं असतं.
जगात आपल्याला
अनेक माणसं आवडतात,
पण त्या आवडत्या
माणसांच्या यादीत स्वत:चं नाव सहसा नसतंच.
अगदी प्रामाणिकपणे सांगा,
जब वी मेट मधली गीत कशी दिलखुलासपणे सांगते,
मै अपनी फेवरिट हूं!
तसं आपण म्हणतो स्वत:विषयी?
म्हणणं सोडा, असं वाटतं आपल्याला स्वत:विषयी!
नाही वाटत,
कारण आपण नसतोच स्वत:चे फेवरिट.
बहुतेकांचं तर आयुष्यात
सगळ्यात मोठं भांडण स्वत:शीच असतं..
सगळ्यात मोठा शत्रू कोण?
तर स्वत:च.
सगळ्यात जास्त राग कोणाचा येतो?
तर स्वत:चाच?
बदलवून टाकावंसं वाटतं स्वत:ला
अगदी पायाच्या नखापासून
डोक्यावरच्या केसांपर्यंत
काहीच आवडत नाही..
एवढंच कशाला, स्वत:चं रंगरूप आवडत नाही
दात आवडत नाहीत, नाक आवडत नाही,
वजन आवडत नाही ते ठीक..
पण स्वत:चं गाव, आडनाव,
आईवडील, त्यांचं साधंभोळं असणं,
आपली आर्थिक परिस्थिती
काही काहीच आवडत नाही..
आणि यासगळ्याशी युद्ध पुकारल्यागत जगणं सुरू होतं..
ज्याच्यावर प्रेमच नाही,
त्याला बदलवायला निघतो आपण?
स्वीकारलंच नाही स्वत:ला आधी,
तर चांगले बदल तरी कसे होणार स्वत:त?
कसं आपण मायेनं कमी करणार स्वत:चं वजन,
जो चेहराच आवडत नाही,
तो गोºया होण्याच्या क्रीम चोपडून
थोडाच आवडणार आहे?
नाहीच आवडत?
मग म्हणायला आपण म्हणतो की,
मी फार प्रेम करतो इतरांवर,
पण लोक माझ्याशी चुकीचं वागतात..
ज्याचं स्वत:वर प्रेम नाही,
ज्याच्याकडे प्रेम ही भावनाच नाही
तो इतरांना ते कसं देणार?
म्हणून या दिवाळीत,
डोक्यातली ही जळमटं काढून टाकू,
स्वत:वर प्रेम करायला लागू..
आणि मग म्हणू की,
प्यार बांटनेसे बढता है..

टॅग्स :diwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017