शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेच्या ‘अनोख्या’ जोडीचा प्रेरणादायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 16:20 IST

एकजुटीने पूर्ण केली गोव्यातील आयर्नमॅन शर्यत 

सचिन कोरडे, पणजी : प्रत्येकाला जीवनाच्या एका टप्प्यात संघर्षातून जावे लागते. जो या स्थितीत हिमतीने पुढे जातो तोच किमयागार ठरतो. आदर्श ठरतो. आपल्या आजूबाजूला अशा बºयाच गोष्टी घडतात. ज्यामधून इतरांना नवी ऊर्जा मिळते. अशीच ऊर्जा देणारी कहाणी गोव्यातील आयर्नमॅन स्पर्धेतून बाहेर आली. श्रीलंकेच्या अनोख्या  जोडीची ही कहाणी अनेकांना चटका लावून गेली.  अंध साथीदारासह अथांग सागरात पोहण्याचे आव्हान, न थांबता ९० किमी सायकलिंग आणि न थांबता २१ किमी धावण्याचे शिवधनुष्य जोडीने पेलेले. तेही एकजुटीने.  श्रीलंकन खालिद ओशमन (पूर्ण अंधत्व ) आणि मिथुन लियानेज (पूर्वी बहिरा होता) या दिव्यांग जोडीचं आयुष्य सामन्यांच्या कल्पनेपलीकडेचं आहे. प्रचंड मेहनती, पूर्ण सकारात्मकता यांच्या जोरावर ही जोडी नकारात्मतेवर मात करीत यशोशिखर गाठत आहेत.  देशातील पहिल्या आॅयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ही जोडी भारतात आली. त्यांनी ही स्पर्धा पूर्णही केली. पोडीयममध्ये जेव्हा ही जोडी आली तेव्हा चाहत्यांनी नतमस्तक होत या जोडीचे स्वागत केले. तेव्हा वातावरण मनाला चटका लावून देणारे होते. पहाटे ६ वाजता ही जोडी समुद्रात उतरली. एकमेकांना बेल्ट बांधून जेव्हा ते पोहत होते तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. खाणाखुणांवर त्यांनी १.९ किमीचे अंतर पूर्ण केले. खालीद हा आंधळा असल्याने त्याला मिथुन सहकार्य करीत होता. त्याच्या इशाºयावर तो समुद्रात पोहत होता. या दोघांनी सायकलिंगही सोबत केले. तसेच धावण्याची शर्यतही पूर्ण केली. एकमेकांना बांधून धावत असलेली ही जोडी अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. खालीदशी जेव्हा संवाद साधला तेव्हा तो म्हणाला, वयाच्या २६ व्या वर्षांपर्यंत मी ठिक होतो. मी २६ व्या वर्षीच माझा सर्व आशा गमावल्या. माझ्यासाठी जिणे अर्थहीन झाले होते. मी तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. २०११ मध्ये वैद्यकीय दुर्लक्षेतेमुळे डोळे गमावले. चुलतभावाने मला समजावून सांगितले तेव्हा माझ्यातील क्रीडापटूच्या प्रवासाला सुरुवात झाली. मी सध्या खूप चांगला आहे. मी तीन वेळा आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्या. खालीद ३५ वर्षांचा आहे. त्याने श्रीलंका क्रिकेट संघाचेही प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने मिथुन (३३) सोबत १.९ किमी स्विमिंग, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी धावण्याची शर्यतही पूर्ण केली. यासाठी त्यांनी ६ तास ४५ मिनिटांचा वेळ दिला. मिथुन म्हणाला की, ओशमनचा जोडीदार असल्याचा मला अभिमान आहे. त्याच्याकडून मी खूप काही शिकलो. तो प्रत्येक दिवशी सराव करतो. तो नोकरी सुद्धा करतो. उत्तम जलतरणपटू असून त्याने श्रीलंकेत अनेकांना प्रेरणा दिली आहे.

टॅग्स :goaगोवा