शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा : सचिन तेंडुलकर

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

टीम इंडियाला आफ्रिकेकडून धोका : सचिन

टीम इंडियाला आफ्रिकेकडून धोका : सचिन
नवी दिल्ली : वर्ल्डकपमधील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानवर शानदार विजय मिळविल्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे; मात्र असे असले तरी येत्या रविवारी होणार्‍या लढतीत टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सावध खेळ करावा लागेल़ कारण चोकर्स नावाने प्रसिद्ध हा संघ केव्हाही प्रतिस्पर्धी संघाला धोका पोहोचवू शकतो़
सचिन म्हणाला, 'बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला विजय मिळवायचा असेल, तर सलामीवीर फलंदाजांनी मजबूत सुरुवात करून देणे गरजेचे आहे़ त्याचबरोबर या संघाविरुद्ध एकेरी आणि दुहेरी धावा काढताना विशेष खबरदारी घ्यावी लागेल़ कारण क्षेत्ररक्षणात या संघाला तोड नाही़ विशेष म्हणजे वर्ल्डकपच्या जेतेपदाचे दावेदार असलेल्या संघात आफ्रिकेचा समावेश आहे़ त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यात आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट खेळ करावा लागेल़'
मास्टर ब्लास्टर म्हणाला, 'पाकिस्तानच्या तुलनेत आफ्रिका संघ अधिक मजबूत आहे़ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात या तीनही विभागांत संघ इतर संघांच्या तुलनेत पुढे आहे़ विशेषत: आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनसमोर भारतीय खेळाडूंची खरी कसोटी राहील़ या सामन्यात भारताचा अनुभवी खेळाडू रोहित शर्मावर सर्वांची नजर राहील'़
टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर कुण्या एका खेळाडूवर अवलंबून न राहता खेळाडूंनी सांघिक कामगिरी करणे गरजेचे आहे़ असे झाल्यास टीम इंडियाला विजयापासून कुणीच रोखू शकत नाही, असेही सचिन तेंडुलकर याने म्हटले आहे़
(वृत्तसंस्था)
०००००