शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्री वर्ल्डकपपर्यंत संचालकपदी !

By admin | Updated: September 27, 2014 02:18 IST

माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांना २०१५ च्या वर्ल्डकपपर्यंत भारतीय संघाच्या संचालकपदी कायम राखण्याचा निर्णय

चेन्नई : माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांना २०१५ च्या वर्ल्डकपपर्यंत भारतीय संघाच्या संचालकपदी कायम राखण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यकारिणीत आज, शुक्रवारी घेण्यात आला. तसेच इंग्लंडमधील निराशाजनक कामगिरीनंतर टीकेचे धनी बनलेले प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनाही वर्ल्डकपपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा २० नोव्हेंबरला घेण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. कार्यकारिणीतील या निर्णयामुळे सहायक स्टाफ सदस्य संजय बांगर, भारत अरुण आणि आर. श्रीधर यांचे करार वर्ल्डकप संपेपर्यंत वाढविण्यात आले आहेत.दरम्यान, निलंबित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या पुनर्वसनासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या मुकुल मुदगल समितीकडून श्रीनिवासन यांना क्लीन चीट मिळेल, अशी आशा बीसीसीआयच्या अनेक सदस्यांना आहे. श्रीनिवासन यांनी तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून बैठकीला उपस्थिती लावली. यावेळी आयसीसीचे पहिले चेअरमन म्हणून श्रीनिवासन यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. सर्वसाधारण सभा पुढे का ढकलण्यात आली, याचे स्पष्टीकरण विदर्भ क्रिकेट असोसिएशनला हवे असल्याने त्यांनी बैठकीत जोरदार विरोध दर्शविला. या बैठकीत बीसीसीआयने माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ट्रेवर पेनी आणि गोलंदाज प्रशिक्षक जो डावेस यांच्यासमोर बंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रुजू होण्याचा पर्याय ठेवला. तो पर्याय त्यांना मान्य नसल्यास त्यांनी पदभार सोडण्याचा अप्रत्यक्ष सल्लाच समितीने दिला. जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तेथील क्रिकेटला बसलेल्या फटक्याची पाहणी करण्यासाठी पथक पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला. (वृत्तसंस्था)