Saudarya Tikhile selection for the state level lawn tennis tournament from Amravati | राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी सौंदर्या तिखिले हिची निवड
राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी सौंदर्या तिखिले हिची निवड

अमरावती : येथील ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयातील इयत्ता बारावीची विद्यार्थिनी सौंदर्या शरदचंद्र तिखिले हिची राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी अमरावती विभागातून निवड झाली आहे. ही स्पर्धा कोल्हापूर येथे १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, संभाजीनगर येथे होणार आहे.

राज्य शासनाचा क्रीडा विभाग व जिल्हा परिषद क्रीडा कार्यालयाद्वारे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय शालेय लॉन टेनिस स्पर्धेत सौंदर्या हिची पुसद येथे निवड झाली होती. विभागीय शालेय लॉन स्टेनिस स्पर्धेत तिने आव्हानात्मक खेळी करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्थान पटकाविले आहे. तिच्या यशाबद्दल क्रीडा विभाग, ब्रजलाल बियाणी महाविद्यालयातील शिक्षक वृंदांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Web Title: Saudarya Tikhile selection for the state level lawn tennis tournament from Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.