ब्रिसबेन : भारताची सानिया मिर्झा व स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस जोडीने डब्ल्युटीए ब्रिसबेन चषक जिंकून गतवर्षीचे आपले विजयी अभियान यावर्षी सुद्धा कायम ठेवले. अग्रमानांकित सानिया-हिंगीस जोडीने वाइल्ड कार्डधारक अॅजिलिकी केरबर आणि आंद्रिया पेटकोव्हिक जोडीचा ६९ मिनिटांत ७-५, ६-१ असा पराभव करून विजेतेपद जिंकले. या जोडीने आत्तापर्यंत ६ विजेतेपद जिंकून या दरम्यान सलग २६वी लढत जिंकली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}