शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेष भारत बॅकफुटवर

By admin | Updated: January 22, 2017 04:31 IST

कर्णधार चेतेश्वर पुजाराच्या झुंजार ८६ धावानंतरही रणजी चॅम्पियन गुजरातच्या धारदार गोलंदाजीसमोर शेष भारत संघाचा डाव उदध्वस्त झाला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यांचा

मुंबई : कर्णधार चेतेश्वर पुजाराच्या झुंजार ८६ धावानंतरही रणजी चॅम्पियन गुजरातच्या धारदार गोलंदाजीसमोर शेष भारत संघाचा डाव उदध्वस्त झाला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यांचा धावफलक ९ बाद २0६ असा ‘कुपोषित’ दिसत होता. गुजरातने काल शुक्रवारी प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३५८ धावा केल्या होत्या. शेष भारतचा सलामीवीर अभिनव मुकुंद चिंतन गजाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाल्यानंतर पुजारा फलंदाजीस आला. त्याने आल्यापासून एक बाजू लावून धरत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला परंतु दुसऱ्या बाजूकडून त्याला चांगली साथ मिळाली नाही. बाद होणारा तो सातवा फलंदाज ठरला. १५६ चेंडू खेळताना त्याने ९ चौकाराच्या सहाय्याने ८६ धावा केल्या. ईश्वर चौधरीच्या शॉर्टबॉलवर तो यष्टीरक्षकाकडे झेल देवून परतला.शेष भारतची धावसंख्या १९१ असताना तीन बळी पडले. पुजारा याच्याशिवाय कुलदीपसिंह आणि शाहबाज नदीमही याच धावसंख्येवर बाद झाले. त्यानंतर एका धावेची भर घालून नववा गडी बाद झाला, त्यामुळे त्यांची धावसंख्या ३ बाद १६६ वरुन ९ बाद १९२ अशी झाली. पुजारा याच्याशिवाय मुंबईकर अखिल हेरवाडकर याने थोडाफार संयम दाखवला. १२४ मिनिटात तो एक षटकार आणि सात चौकारासह ४८ धावा करुन बाद झाला. गुजरातकडून हार्दिक पटेलने आणि चिंतन गजाने प्रत्येकी तीन तर मोहित थडानीने दोन बळी घेतले.तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात आपल्या ८ बाद ३00 धावावरुन पुढे खेळताना गुजरातने ७५ मिनिटात ५८ धावा जोडल्या. शतकवीर चिराग गांधीने ३३ धावांची भर टाकून १६९ धावा केल्या. सिध्दार्थ कौलने त्याचा त्रिफळा उडवला. (वृत्तसंस्था) संक्षिप्त धावफलकगुजरात पहिला डाव : १0२.५ षटकात सर्वबाद ३५८ धावा (चिराग गांधी १६९, मनप्रीत जुनेजा ४७; सिध्दार्थ कौल ५/८६, पंकज सिंग ४/१0४).शेष भारत पहिला डाव : ७२ षटकांत ९ बाद २0६ धावा. (अखिल हेरवाडकर ४८, चेतेश्वर पुजारा ८६; चिंतन गजा ४/४३, हार्दिक पटेल ३/७३.)